This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

भारतीय दिग्दर्शकांनी इफ्फि 2017 च्या इंडियन पॅनोरमासाठी निवड झालेल्या आपल्या चित्रपटाबाबत संवाद साधला

 


पणजी, 24-11-2017

इफ्फि 2017  मध्ये आज पाचव्या दिवशी, होइहोबोते धेमालिते’ या आसामी चित्रपटाचे दिग्दर्शक बिद्युत कोटोकी, ‘क्षितिज: ए होरायझन’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मनौज कदम्ह , ‘जुझे’ या कोकणी  चित्रपटाचे दिग्दर्शक मिरांशा नाईक आणि ‘व्हेंटिलेटर’ या मराठी  चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

होइहोबोते धेमालिते’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय सिनेफेस्ट 2017 मध्ये सर्व श्रेष्ठ विदेशी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. हिंसाचारात वाढणाऱ्या मुलांवर, त्या क्रूरतेचा कसा खोलवर परिणाम होतो, त्यांच्या विकासावर कशी छाया पडते याचे चित्रण या चित्रपटात आढळते.

या चित्रपटामुळे सर्व काही लगेच बदलेल अशी आपली आशा नाही मात्र आपण जोपर्यंत प्रश्न उपस्थित करणार नाही तोपर्यंत काही बदलणार नाही असे कोटोकी म्हणाले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण सुरु ठेवण्याची धडपड करणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलीची ‘क्षितिज’ ही कहाणी आहे. चित्रपट हा समाजच आरसा आहे आणि माझा चित्रपट समाजाशी संवाद साधतो असे मनोज कदम्ह यांनी सांगितले.

‘जुझे’ गोव्यातल्या एका छोट्याश्या गावात दहशत निर्माण करणाऱ्या जमीनदाराची ही  कथा आहे, ज्यामध्ये एक जिद्दी युवक आत्म शोधाच्या मार्गावर वाटचाल करतो. चित्रपट तयार करणे म्हणजे माझ्यासाठी एक गोष्ट सांगण्याप्रमाणे आहे आणि या चित्रपटात आपण हाच प्रयत्न केल्याचे मिरांशा नाईक यांनी सांगितले.

‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटासाठी राजेश मापुस्कर यांनी लेखन  आणि दिग्दर्शन केले आहे तर प्रियांका चोपडा यांनी निर्मिती केली आहे.

आपल्या एका नातेवाईकाला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले असता कुटुंबातल्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर या चित्रपटासाठी कथानक लिखाण सुरु केले आणि असा कठीण प्रसंगाला विनोदाची फोडणी देऊन हा चित्रपट निर्माण केल्याचे मापुस्कर म्हणाले.

४८ वा  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात 28  नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

 

उजवीकडून डावीकडे : किशन रत्नानी (पीआयबी), राजेश मापूस्कर, मिरांशा नाईक, मनौज कदाम्ह, बिद्युत कोटोकी

 
PIB Release//233
सप्रे -नि चि -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau