This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

सध्याच्या काळातल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी चित्रपट अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयावर खुला मंच मध्ये चर्चा

 


पणजी, 24-11-2017

चित्रपट क्षेत्राशी संबंधित बाबी दर्जेदार राहाव्यात यासाठी विभिन्न स्तरावर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असा सूर  इफ्फिमध्ये" सध्याच्या काळातल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी चित्रपट अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची आवश्यकता" या विषयावर रंगलेल्या खुल्या मंचावरच्या चर्चेत व्यक्त करण्यात आला.

  पुणे एफ टी आय आय चे अधिष्ठाता (चित्रपट) अमित त्यागी, ऑस्ट्रेलियाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक  एना तिवारी, नवी  दिल्लीच्या चित्रपट अभ्यासक सुखप्रीत कहलो, गोव्यातले चित्रपट निर्माते शशांक भोसले यामध्ये सहभागी झाले होते.

 आपल्या देशात 30 वर्षाखालील सुमारे पाच ते सात कोटी लोक आहेत मात्र एफ टी आय आय केवळ 110 विद्यार्थ्यांची निवड करते असे सांगून, या युवा वर्गासाठी आणखी चित्रपट संस्थांची गरज त्यागी यांनी अधोरेखित केली. ध्वनी-चित्र माध्यमामध्ये रुची असलेल्यांचे आपण स्वागत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या देशात सुमारे 300  वाहिन्या आहेत हे लक्षात घेऊन आपण ध्वनी-चित्र माध्यम असा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटासाठी, सर्वच स्तरावर सुयोग्य प्रशिक्षणाची गरज असते असे सांगून त्यांनी आपला मुद्दा विशद केला.

 

गेली 10 वर्षे  ऑस्ट्रेलियाच्या रहिवासी असलेल्या एना तिवारी यांनी सामाजिक दृष्ट्या संवेदनशील राहण्याची आणि समाजातली विविधता समोर आणण्याच्या गरजेवर भर दिला. चित्रपट विषयक शिक्षणामुळे एक पाठबळ देणारी यंत्रणा निर्माण होते असे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपट निर्मितीसाठी सांस्कृतिक समज आवश्यक असते असे सांगून ऑस्ट्रलियन चित्रपटात त्याचा अभाव असल्याचे त्या म्हणाल्या.

औपचारिक  चित्रपट शिक्षणाबरोबरच  युवा पिढीला भारताच्या समृद्ध चित्रपट वारसा समजावून   देण्यासाठी  शिक्षण आवश्यक असल्याचे सुखप्रीत कहलो यांनी सांगितले.

युवा चित्रपट निर्माते शशांक भोसले यांनी कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय चित्रपट विषयक आपल्या प्रवासाच्या सुरवातीचे अनुभव कथन केले. चित्रपट निर्मितीसाठी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नसते असे मत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून आलेल्या भोसले यांनी व्यक्त केले.

 
PIB Release//236
सप्रे -नि चि -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau