This Site Content Administered by
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त होणार

नवी दिल्ली, 6-2-2017

मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त होणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला सांगितले. नियोजन आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांच्यासोबत काल मुंबईत त्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत, हागणदारीमुक्त होण्याचे ध्येय महाराष्ट्र लवकरच गाठेल असा विश्वास क्षत्रिय यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र सरकार केवळ हागणदारीमुक्त होण्याचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील नाही तर राज्यात स्वच्छ भारत अंमलबजावणीचा भाग म्हणून स्वच्छतेच्या इतर सवयी नागरिकांच्या बाणविण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.  राज्यात स्वच्छ कार्यालय, स्वच्छ ग्रामपंचायती, स्वच्छ शाळा अशा स्वच्छताविषयक विविध मोहिमा राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या या मोहिमांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन नियोजन आणि स्वच्छता मंत्रालयाच्या  सचिवांनी दिले. जिल्हा स्वच्छ भारत प्रेरक उपक्रमांतर्गंत राज्यांमध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी जिल्हा पातळीवर प्रेरकाची नियुक्ती केली जाणार आहे.  टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसमोर एक सादरीकरण करण्यात आले.  शालेय स्वच्छतेसह स्वच्छताविषयक अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी नमूद केले.

 
PIB Release/DL/190
सप्रे -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau