This Site Content Administered by
पंतप्रधान

दहशतवादावर मात करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

 


मुंबई, 26-11-2017

दहशतवादावर मात करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बातच्या ३८ व्या भागात मोदी म्हणाले कि दहशतवाद आणि अतिरेकीवाद यावर मात करण्यासाठी केवळ भारताने नाही तर मानवतावादी शक्तींनी अधिक सावध होण्याची गरज आहे.

जगभरातील मानवतेला दहशतवादाचा धोका असून मानवतावादी शक्ती नेस्तनाबूत करण्याकडे त्यांचा कल आहे.

 मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि सुरक्षा जवानांचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले कि हा देश त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. ते म्हणाले कि काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत दहशतवादाच्या धोक्यांबाबत बोलत होता, तेव्हा जगभरातील अनेक लोक ते गंभीरपणे घ्यायला तयार नव्हते. मात्र आता जेव्हा दहशतवाद त्यांच्या दारापर्यंत पोहोचला आहे, जगभरातील प्रत्येक सरकार ज्याचा मानवतेमध्ये विश्वास आहे, ते आज याकडे सर्वात मोठे आव्हान म्हणून पाहत आहेत.

संविधान दिनानिमित्त संविधान सभेच्या सदस्यांचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले कि संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी या सदस्यांनी तीन वर्षे अथक मेहनत घेतली. आणि ज्यांनी ते वाचले आहे त्यांना या दूरदृष्टीबाबत अभिमान वाटेल.

सर्वाना समानता आणि सर्वांप्रती संवेदनशीलता हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्कांची ते हमी देते.

मोदी म्हणाले कि संविधानाचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. संविधानाची भावना हीच लोकशाहीची भावना असल्यामुळे नागरिक आणि प्रशासनाने त्यानुसार पूढे जावे. संविधानाच्या निर्मात्यांच्या विचारानुसार नवीन भारताची निर्मिती करणे हि सर्वांची जबाबदारी आहे.

 मोदी यांनी संविधान दिनानिमित्त मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आदरांजली वाहिली. ते म्हणाले कि संविधानावर त्यांच्या नेतृत्वाचा अमीट ठसा आहे, ज्यात समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाकडे त्यांनी लक्ष दिले आहे.

त्यांनी संविधान सभेचे सदस्य  लोहपुरुष सरदार पटेल यांनाही आदरांजली वाहिली. भारताला एक राष्ट्र बनवण्याचे असाधारण कार्य सरदार पटेल यांनी हाती घेतले होते. 

४ डिसेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले कि भारतीय नौदल सागरी सीमांचे संरक्षण करत आहे. ते म्हणाले  कि नद्या आणि समुद्र आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण जगाचे ते प्रवेशद्वार आहेत. ते म्हणाले कि महासागराबरोबर भारताचे अतूट नाते आहे.

मोदी म्हणाले कि स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाने विविध प्रसंगी आपले शौर्य दाखवून दिले आहे, मग तो गोव्याचा मुक्ती संग्राम असो किंवा भारत-पाक युद्ध असो.

ते म्हणाले कि यावर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारला मोरा चक्रीवादळाचा तडाखा बसला असताना नौदलाच्या आयएनएस सुमित्राने बचावकार्यात मोठी मदत केली आणि अनेक मच्छीमारांची समुद्रातून सुटका केली आणि त्यांना बांग्लादेशच्या हवाली केले. ते म्हणाले कि यावर्षी श्रीलंकेत भीषण पूर आला असताना भारतीय नौदलाची तीन जहाजे त्वरित तिथे पोहोचली आणि तेथील लोकांना मदत केली. सप्टेंबर महिन्यात बांग्लादेशमध्ये रोहिंग्या संकटादरम्यान आयएनएस घडियालने मानवतावादी सहायता केली.

मोदी म्हणाले कि पापुआ न्यू गिनियाच्या मच्छीमाराना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने मोलाची कामगिरी बजावली. पश्चिम आखातात व्यापारी जहाजाची तस्करी आयएनएस त्रिकांडाने रोखली.

भारतीयानी नेहमीच लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांप्रती अभिमान आणि आदराची भावना बाळगली आहे आणि प्रत्येक भारतीयाने जवानांच्या धैर्य, शौर्य आणि बलिदानाला सलाम केला आहे.

संरक्षण मंत्रालयाने १ ते ७ डिसेंबर दरम्यान सशस्त्र दलांप्रती जनजागृती करण्यासाठी एक अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. या अभियानात सशस्त्र दलांबद्दल माहिती जनतेला दिली जाणार आहे. या संपूर्ण आठवड्यात प्रत्येकाने तरुण असो वा वृद्ध, ध्वज लावावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी आपण सशस्त्र दलांच्या ध्वजांचे वाटप करू शकतो. तुमच्या शेजारी राहत असेलेल्या किंवा नात्यातील जवानांचे सशस्त्र दलांतील अनुभव किंवा शौर्यकथा याबाबतचे संबंधित विडिओ अथवा छायाचित्रे   #armedforcesflagday वर पाठवू शकता. सशस्त्र दलातील लोकांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये माहिती देण्यासाठी निमंत्रित करता येईल असे ते म्हणाले.

२०२२ पर्यंत युरियाचा वापर निम्म्याने कमी करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी संकल्प केला कि धरणी मातेचे आरोग्य सुधारेल आणि उत्पादनही वाढेल.

देशभरातील शेतकऱ्यांकडे १० कोटी मृदा आरोग्य कार्डे आहेत असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे त्यांना मातीबाबत अधिक माहिती जाणून घेता येईल नि त्यानुसार पेरणी करता येईल.

स्वच्छतेसाठी आबालवृद्ध , महिला-पुरुष सर्वानी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. दिव्यांगांना संधी आणि सुविधा पुरवण्यावर विशेष भर दिला जात असून देशातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जनतेने  सकारात्मक अनुभव  #PositiveIndia किंवा नरेंद्र मोदी अँप किंवा माय गोव्ह वर पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.

 
PIB Release/MH/245

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau