This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

मुंबई आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी महोत्सव 2018 साठी अभूतपूर्व प्रतिसाद सुवर्ण आणि रौप्य शंखासाठी 792 चित्रपट रिंगणात

 


सुवर्ण शंख पुरस्काराची रक्कम दुप्पट


पणजी, 26-11-2017

भारतातला बहुप्रतिक्षित डॉक्युमेंटरी चित्रपट महोत्सव, मिफ्फ अर्थात डॉक्युमेंटरी, लघु आणि ॲनिमेशन चित्रपटासाठीचा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 28 जानेवारी 2018 ला मुंबईत एनसीपीएला उद्‌घाटन होणार आहे. उत्कृष्ट डॉक्युमेंटरी, लघु आणि ॲनिमेशनपटांचा हा महोत्सव आठवडाभर रंगणार असून, तीन फेब्रुवारीला त्याचा समारोप होणार आहे. कथाबाह्य चित्रपटांचा, दक्षिण आशियातला सर्वात जुना आणि मोठा असलेला हा महोत्सव 1990 मध्ये सुरु झाला. फिल्म्स डिव्हिजन आणि माहिती प्रसारण मंत्रालय हा महोत्सव आयोजित करते. माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखालच्या मिफ्फ संयोजन समितीत, चित्रपट क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती, डॉक्युमेंटरी निर्माते आणि चित्रपट समीक्षकांचाही समावेश असतो.

15व्या मिफ्फला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, भारत आणि जगभरात दुमदुमणारी डॉक्युमेंटरी संस्कृती अधोरेखित करतो. महोत्सव संचालनालयाला, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी 32 देशातल्या 194 प्रवेशिकांसह, विक्रमी 790 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी 596 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या प्रवेशिकांची छाननी करुन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी त्यांची शिफारस करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.

डॉक्युमेंटरींना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी चित्रपटासाठीच्या सुवर्ण शंख पारितोषिकाची रक्कम दुप्पट करायला म्हणजे आधीच्या पाच लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करायला मंजुरी दिली आहे.

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी, सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिक्शन आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपट विभागात सुवर्ण शंख, रौप्य शंख आणि चषकासह रोख रकमेच्या पारितोषिकाने गौरवण्यात येते. याशिवाय, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, संकलन आणि साऊंड डिझाईन सारख्या तंत्रविषयक क्षेत्रातही पुरस्कार दिले जातात. प्रमोद पाटी ज्युरी पारितोषिक, उत्कृष्ट विद्यार्थीपट, उत्कृष्ट पदापर्ण यासाठीही करंडक आणि रोख रक्कम पारितोषिक प्रदान केले जाते. भारतीय डॉक्युमेंटरी निर्माता संघटना, आयडीपीए आणि महाराष्ट्र शासनाने दादासाहेब फाळके चित्रनगरीद्वारे या पारितोषिकांसाठी फिल्म्स डिव्हिजनला सहकार्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेतल्या उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यासाठी महोत्सव महासंचालनालय, भारतातल्या आणि परदेशातल्या एका नामवंत चित्रपट निर्मात्याचा समावेश असलेल्या दोन ज्युरींची निवड करत आहे.

विविध स्पर्धात्मक श्रेणी बरोबरच ज्युरी रेट्रॉस्पेक्टीव्ह अर्थात सिंहावलोकन आणि बेस्ट ऑफ फेस्टीवल अर्थात महोत्सवातले सर्वोत्कृष्ट या विभागासह इतर विभागातही देश-विदेशातले उत्तम डॉक्युमेंटरी, शॉर्ट आणि ॲनिमेशनपट दाखविण्यात येणार आहेत. रशियन आणि तुर्की ॲनिमेशनपट, फ्रेंच लघुपट, एनएफएआय आर्काइव्ह, आग्नेय आशियाकडचे चित्रपट अशी विविध विशेष पॅकेजेस आयोजित करण्यात आली आहेत. श्रद्धांजली विभागातही चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

चित्रपट निर्माते आणि संबंधितांना समृध्द आणि अनुभवसंपन्न करण्यासाठी या महोत्सवात सिनेमॅटोग्राफी विषयक कार्यशाळाही घेण्यात येतील. निर्मात्यांना वित्त पुरवठ्यासाठी आणि भारतात तसेच परदेशात चित्रपट प्रदर्शित करण्याच्या संधी शोधण्यासाठी मदत व्हावी, यादृष्टीने मिफ्फमध्ये डॉक्युमेंटरी निर्मात्यांसाठी फिक्की, व्यापार मंचही ठेवण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातला प्रस्ताव प्रारंभिक टप्प्यात आहे.

भारतातल्या डॉक्युमेंटरी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठीचा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, स्वतंत्र ज्युरींनी निवड केलेल्या डॉक्युमेंटरी निर्मात्याला प्रदान करण्यात येईल. जीवनगौरव पुरस्काराची रक्कम दुप्पट करुन ती पाच लाख रुपयांवरुन दहा लाख करण्यात येत आहे. मिफ्फ 2018 मध्ये एकूण 58 लाख रुपयांची रोख पारितोषिक प्रदान करण्यात येतील.

फिचर फिल्म अर्थात कथापट हे सर्वसाधारणपणे जनतेचे मनोरंजन करतात, तर डॉक्युमेंटरी, जनतेची माहितीविषयक गरज पूर्ण करतात. मिफ्फ हा जनतेचा महोत्सव ठरावा, जनतेला तो आपलासा वाटावा या उद्देशाने प्रतिनिधींसाठी माफक 100 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधींसाठी कोणतेही शुल्क ठेवण्यात आलेले नाही.

मुंबईत पेडर रोड इथल्या फिल्म्स डिव्हिजन संकुलातल्या थिएटरमध्ये आणि जवळच्या रशियन कल्चर सेंटरमधे 29 जानेवारी 2018 पासून डॉक्युमेंटरी दाखवण्यात येतील. यासाठी मुंबईत येऊन या डॉक्युमेंटरींचा आनंद अनुभवा.

फिल्म्स डिव्हिजनविषयी

1948 मध्ये स्थापना झालेला फिल्म्स डिव्हिजन अर्थात चित्रपट प्रभाग भारतातल्या डॉक्युमेंटरी चळवळीचा जनक आहे. या विभागाने तयार केलेली, स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताचे परिवर्तन दर्शवणारी न्युज रील आणि इंडियन न्यूज रिव्ह्यु मालिका आता समृद्ध संग्रहाचा भाग बनली आहे. फिल्म्स डिव्हिजनने गेली अनेक वर्ष 9000 चलचित्रपटांची निर्मिती केली. स्वत: डॉक्युमेंटरी निर्मिती करण्याबरोबरच फिल्म्स डिव्हिजन, बाह्य निर्मिती योजनेद्वारे स्वतंत्र डॉक्युमेंटरी निर्मात्यालाही सहकार्याचा हात देते. डॉक्युमेंटरी आणि लघुपट निर्मितीत कार्य करणाऱ्या सिटीसिव्हिल ऑर्गनायझेशनसमवेत फिल्म्स डिव्हिजनने नुकतेच सहकार्य केले आहे.

 
PIB Release//247
सप्रे -काणे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau