This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

डिजीटल क्रांतीमुळे चित्रपटाचे बदललेले स्वरुप’ या विषयावर ओपन फोरममध्ये चर्चा

 


पणजी, 27-11-2017

गोव्यात सुरू असलेल्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज ओपन फोरममध्ये आज शेवटचे सत्र पार पडले. ‘डिजीटल क्रांती...चित्रपटाचे बदलते स्वरुप’ हा आजच्या सत्रातील चर्चेचा विषय होता. उज्ज्वल निरगुडकर, सभासद- अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस, संजय चांदेकर, प्रमुख, रेडिओ एफटीटीआई पुणे, राजेंद्र तालक, उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन संस्था, एम. ए. राघवेंद्रन, चित्रपट संशोधक आणि समीक्षक यांनी चर्चेत भाग घेतला. इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सूत्रसंचालन केले.   

उज्ज्‍वल निरगुडकर यांनी डिजीटल तंत्राविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले की, भारतात 2008 पासून चित्रपटांमध्ये डिजीटल तंत्राचा वापर होण्यास सुरुवात झाली. सध्या दर तीन महिन्यांनी डिजीटल तंत्रात सुधारणा होत आहे. त्यामुळे अमेरिका आणि जपान या देशांप्रमाणेच भारतताही लवकरत ‘हाय अल्ट्रा डेफिनेशन’ चे युग अवतरेल. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, डिजीटल तंत्रज्ञानाची खरी समस्या आहे ती साठवणूक क्षमता आणि कालावधी. यावरही लवकरच तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या प्रथितयश संस्थेच्या रेडिओ विभागाचे प्रमुख संजय चांदेकर यांनी साऊंडट्रॅकविषयी आपले मत मांडले. डिजीटल तंत्रज्ञानामुळे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण खरी समस्या हीच आहे की, यामधून चांगला पर्याय निवडणे कठीण जात आहे. साऊंड इंजिनिअरसुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गोंधळलेले दिसत असल्याचे ते म्हणाले.

 गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापरावर भर देण्यास सांगितले. तसेच गोवा मनोरंजन संस्था आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अधिक तंत्रज्ञानाभिमुख आणि सुविधाजनक करण्यासाठी 2019 मध्ये नवीन जागेत स्थलांतरित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधक आणि चित्रपट समीक्षक एम ए राघवेंद्रन यांनीही चर्चेत सहभाग घेत आपली मते नोंदवली.

 प्रत्येकालाच दरवेळी काहीतरी नवे तंत्रज्ञान पाहण्याची आणि त्या माध्यमातून काम करण्याची इच्छा असते. म्हणूनच तंत्रज्ञानावर आधारीत चित्रपटांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत आयडीपीए अध्यक्ष माईक पांडे यांनी चर्चासत्राचा समारोप केला.

 
PIB Release//254
सप्रे -सो.कु. -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau