This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

इफ्फी 2017 मध्ये ॲटम इगोयान यांचा मास्टर  क्लास

 


पणजी, 27-11-2017

48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आठव्या दिवशी कॅनडाचे नाटय आणि चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ॲटम इगोयान यांनी  एक विशेष अभ्यासवर्ग भरवला. ॲटम इगोयान हे कॅनडामध्ये सुप्रसिध्द दिग्दर्शक असून त्यांच्या अनेक चित्रपटांनी  आंतरराष्ट्रीय स्तरावर  नावलौकिक मिळवला आहे.  एक्झॉटिका या त्यांच्या चित्रपटाने 1994 साली कानमध्ये FIPRESCI   पुरस्कार पटकावला होता तर स्वीट हिअर आफ्टर या समिक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाला अकादमी पुरस्कारांसाठी दोन गटांमध्ये नामांकने प्राप्त झाली होती.

इफ्फी 2017 मध्ये ॲटम इगोयान यांनी भरवलेला मास्टर क्लास होतकरु चित्रपट निर्मात्यांसाठी  परवणी ठरला. चित्रपट दिग्दर्शनाची शैली आणि दिग्दर्शनाच्या इतर पैलूंबाबत या विशेष वर्गात त्यांनी प्रामुख्याने चर्चा केली.  कोणत्याही चित्रपटासाठी काम करतांना दिग्दर्शकाने प्रेक्षकाच्या नजरेतून कल्पना केली पाहिजे, असे केले तरच तुम्हाला अभिप्रेत असलेली कलाकृती सादर करता येईल. माझ्या चित्रपटांमधून, त्यांच्या बांधणीमधून, कथाकथनांमधून आणि परिस्थितीमधून  प्रदर्शित केलेले सर्व काही सत्य आणि नैसर्गिक भासले पाहिजे, असे मत इगोयान यांनी या वर्गात संवाद साधतांना व्यक्त केले.

इगोयान यांनी इफ्फी 2017 मध्ये  सहभागी होण्याची तयारी दर्शविल्यामुळे अतिशय आनंद झाल्याचे सुनित टंडन यांनी सांगितले. त्यांचे चित्रपट इफ्फीमध्ये  नेहमीच प्रदर्शित केले जातात.  त्यांनी व्यक्तिश: येथे उपस्थित राहणे हा आनंददायी अनुभव असल्याचेही ते म्हणाले.

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2017 या अवधीत 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

 
PIB Release//255

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau