This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

इफ्फी 2017 मध्ये “सिनेमा विरुध्द ऑनलाईन मजकूर प्रदाते” याविषयी करण जोहर, एकता कपूर आणि सुधांशु वत्स यांच्यात चर्चा

 


मुंबई, 27-11-2017

48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आठव्या दिवशी मास्टरिंग अ न्यू रिॲलिटी याविषयी आयोजित चर्चासत्रात सुप्रसिध्द चित्रपट निर्माते करण जोहर, दूरचित्रवाणी मालिकांच्या दिग्दर्शक एकता कपूर आणि व्हाय कॉम 18 ग्रुपचे  मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशु वत्स सहभागी झाले. 

चित्रपट निर्मिती क्षेत्रात अलिकडच्या काळात बरीच प्रगती झाल्याचे मत चित्रपट निर्माता करण जोहर यांनी व्यक्त केले.  कथाविषयक आणि तंत्रज्ञानाचा वापर दोन्ही बाबतीत खूपच जास्त बदल होत गेल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे दूरचित्रवाणी, इंटरनेट आणि मोबाई ही चित्रपट पाहण्याची स्थळे दर्शकांना उपलबध झाली आहेत. त्यामुळे सिनेमा थिएटरांमधील दर्शकांची  संख्या घटली आहे, असेही ते म्हणाले.   डिजिटल मजकूर व्यक्ती विशिष्ट असतो आणि प्रत्येक क्षेत्रात त्याचा संदर्भ वेगळा असतो, असे निरिक्षण एकता कपूर यांनी व्यक्त केले.  चित्रपट निर्मितीचे दोन महत्वपूर्ण पैलू असतात. त्यापैकी एक चित्रपटगृहाशी संबंधित असतो तर दुसरा चांगल्या महसूलाशी संबंधित असतो, असे मत सुधांशु वत्स यांनी व्यक्त केले.

 

रोणोजय बॅनर्जी यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले.  श्रोत्यांनी या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला.

गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2017 या अवधीत 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  त्याअंतर्गंत अशा विविध  चर्चा आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 
PIB Release/MH/258

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau