This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

ॲटॉम इगोयान यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
इफ्फी 2017 मध्ये ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ चित्रपटाने मिळवला गोल्डन पिकॉक पुरस्कार
अमिताभ बच्चन यांचा ‘इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव
मराठी चित्रपट ‘क्षितीज-अ होरायझन’ला आयसीएफटी-युनेस्कोचं गांधी पदक

 


पणजी, 28-11-2017

गोव्याची राजधानी पणजी इथं गेल्या 9 दिवसांपासून सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज एका दिमाखदार सोहळ्यानं सांगता झाली. ‘कथांच्या माध्यमातून जगाला जोडणे’ अशी यंदाच्या इफ्फीची संकल्पना होती. चित्रपट सृष्टीतील अनेक तारे-तारका आणि दिग्गजांच्या मांदियाळीत आज सुवर्ण मयूर, रजत मयूर, जीवन गौरव पुरस्कार, पर्सनालिटी ऑफ द इयर असे विविध पुरस्कार देण्यात आले.

मोरोक्को इथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पीलो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’-सुवर्ण मयुर पुरस्कार मिळवला.

1990 च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या ‘कांस’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला. 40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या ‘अँजल्स वेअर व्हाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. रजत मयुर आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महेश नारायणन् यांच्या ‘टेक ऑफ’ या मल्ल्याळी चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी.के यांनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. तर नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर आणि 10 लाख रुपये दिले जातात. महेश नारायणन् यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला. विशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र प्रदान केले जाते.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची यंदाच्या ‘पर्सनालिटी ऑफ द इयर पुरस्कारा’साठी निवड झाली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या ‘डार्क स्कल’ या चित्रपटाने मिळवला. रजत मयुर सन्मान मिळवणारा हा रुसो यांचा पहिलाच चित्रपट आहे.

या महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. 10 लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपट क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांचे चित्रपट दाखवण्यात आले आहेत. ‘एक्झॉटीका’, ‘द स्वीट हीयरआफ्टर’ आणि ‘रिमेंबर’ हे त्यांचे चित्रपट यंदाच्या महोत्सवात दाखवण्यात आले.

मनोज कदम यांच्या ‘क्षितिज-अ होरायझन’ या मराठी चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला. महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, दोन संस्कृतींमधला संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्तींमधे विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो. ‘क्षितिज’ या चित्रपटात ऊस कामगाराची मुलगी वच्छी आणि गरीब परिस्थितीतून शिक्षण घेण्यासाठी तिने केलेला संघर्ष याची कथा रंगवण्यात आली आहे.

दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि जाहिरा वसीम यांनी आजच्या सांगता सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, भूमी पेडणेकर, सुशांतसिंग राजपूत, सिद्धार्थ मल्होत्रा आणि हुमा कुरेशी या अभिनेत्यांची आजच्या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. गायक आणि संगीतकार पॅपोन यांनी सादर केलेली गाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नृत्यानं कार्यक्रमाची रंगत वाढली.

 
PIB Release//260

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau