This Site Content Administered by
ऊर्जा

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांची परिषद संपन्न
 ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करुन सर्वांना अखंड वीज पुरवठा देण्याचा संकल्प

नवी दिल्ली, 8-12-2017

देशातल्या सर्व राज्यातल्या ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री राजकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यात 17 राज्यांचे आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे ऊर्जा मंत्री सहभागी झाले होते. यावेळी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. तसेच काही सूचनाही दिल्या. ऊर्जा क्षेत्रातल्या कुठल्याही समस्येबद्दल राज्यातल्या मंत्र्यांनी नि:संकोचपणे केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी केले.

यावेळी ऊर्जा क्षेत्राशी निगडीत विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला तसेच देशभरातल्या सर्व गावांमध्ये डिसेंबर 2017 पर्यंत तर सर्व घरांमध्ये डिसेंबर 2018 पर्यंत वीज पुरवठा करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच सर्व ग्राहकांना सुयोग्य आणि अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी मार्च 2019 ही सीमा निश्चित करण्यात आली. ऊर्जा पारेषण विभागाची सरकारची थकीत बीलं आणि त्यावरती 25 टक्के विलंब शुल्क मार्च 2019 पर्यंत फेडावीत. ऊर्जा पुरवठ्याची गुणवत्ता वाढवणे आणि अतांत्रिक कारणांमुळे होणारे भारनियमन कमी करणे हा संकल्पही करण्यात आला.

ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक आराखडा यावेळी तयार करण्यात आला. देयकं भरण्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन, ऊर्जा संवर्धन आणि नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना यावेळी ठरवण्यात आल्या.

 
PIB Release/DL/1909
बीजी -राधिका -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau