This Site Content Administered by
अर्थ

जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महसूलात वाढ-केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला

 


मुंबई, 9-12-2017

केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी आज मुंबई येथे इंडो अमेरिकन फ्रेंडशिप ग्रृपतर्फे आयोजित जीएसटीवरील चर्चासत्रात आपले मत मांडतांना सांगितले की, उर्वरित 50 वस्तू ज्या 28 टक्के कराच्या अंतर्गत येतात त्यांना सुद्धा ग्राहक, व्यवसायिक आणि उद्योजकांना सोयिस्कर होईल अशा दृष्टीने कमी कराच्या कक्षेत समाविष्ठ केलं जाईल. ही प्रक्रिया मार्च 2018 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

जीएसटी कर लागू झाल्यापासून 4 महिन्यात संपूर्ण देशात कराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. भारतापूर्वी 170 देशांनी जीएसटीची अंमलबावणी करायला सुरुवात केली होती. परंतु भारताने या चार महिन्यात जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी केल्यानं महसूलात वाढ दिसून आली आहे. व्यावसायिकांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा देऊन जीएसटी पुढेही यशस्वी होण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लघु, मध्यम उद्योग (एसएमई) बाबत बोलतांना शुक्ला म्हणाले की, स्टॅण्डअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि इतर अनेक उपक्रमांमुळे अनुसूचित जाती जमाती आणि महिलांना प्रोत्साहन देण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांनी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद संपूर्ण खर्च करून अतिरिक्त निधी या क्षेत्रासाठी सरकारकडून मागविल्याचे सांगितले. तसेच विविध योजनांमुळे जवळपास वार्षिक 2 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चासत्रात डॉ. विश्वास पानसे, पुष्पेंद्र बन्सल यांनी आपली मते मांडली.

 
PIB Release/MH/263
बीजी -काणे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau