This Site Content Administered by
युवक कल्‍याण व क्रीडा

युवक व्यवहार विभागाचा वार्षिक आढावा     

नवी दिल्ली, 13-12-2017

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक व्यवहार विभागाच्या 2017 या वर्षभरातील महत्वपूर्ण कामगिरीचा आढावा :-

नेहरु युवा केंद्र संगठन (एनवायकेएस)

देशभरातील युवा वर्गाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याबरोबरच त्यांना राष्ट्र उभारणींशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेणे हे नेहरु युवा केंद्र संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. देशभरातील सुमारे 3,15,000 युवक-युवतींनी यात नोंदणी केलेली आहे.

या वर्षभरात संघटनेच्या प्रतिनिधींनी देशभरात 7,93,000 रोपटयांची लागवड केली. 10,166 युनिट रक्तदान केले. देशभरात कौशल्य विकास संबंधी 2,327 प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. 69,597 नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

गट आणि जिल्हा स्तरावर क्रीडा विषयक 1,331 उपक्रम राबविण्यात आले, त्यात 1,67,605 युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या दिनानिमित्त देशभरात 8,054 कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात 11,19,587 युवक-युवती सहभागी झाले.

 याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय योग दिवस, स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता ही सेवा अभियान, स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी अशा अनेक उपक्रमांमध्ये नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी सहभागी झाले.

चंपारण्य चळवळीतल्या 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बिहारमध्ये आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या 768 युवकांनी सहभाग नोंदवला. गुवाहाटी  आणि रायपूर येथे आयोजित युवा परिषदेतही या प्रतिनिधींचा लक्षणीय सहभाग होता.

गंगा निरीक्षण यात्रा, गंगा वृक्षारोपण सप्ताह, पर्यटन पर्व, एक भारत श्रेष्ठ भारत अशा अनेक उपक्रमांमध्येही संघटनेचे सदस्य सक्रीय सहभागी झाले.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)

देशभरातील उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि चारित्र्याचा विकास स्वयंसेवी उपक्रमांच्या माध्यमातून घडवून आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजना सक्रीय आहे. देशभरातील 396 विद्यापीठे, 16,331 महाविद्यालये आणि 28,621 उच्च माध्यमिक शाळांमधील 3.86 दशलक्ष विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य आहेत.

चालू वर्षात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे 22 लाखांहून जास्त सदस्य सहभागी झाले. योजनेतील स्वयंसेवकांनी या वर्षभरात 33.54 लाख रोपटयांची लागवड केली आणि 3.96 लाख युनिट रक्तदान केले. 

देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी 17,134 आरोग्य शिबिरांचे आयोजन केले, त्यात 9.93 लाख स्वयंसेवक सहभागी झाले.  या वर्षभरात 1,48,000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी देशातील विविध उपक्रमांमध्ये श्रमदान केले तर 2,00,000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी स्वरक्षणाचे धडे दिले. वस्तू आणि सेवा कर तसेच डिजिटल पेमेंटबद्दल जनजागृती करणाऱ्या उपक्रमांमध्येही हे स्वयंसेवक सहभागी झाले.

राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट (आरजीएनआयवायडी)

युवकांच्या विविध मुद्दयांशी संबंधित प्रशिक्षण देणारी आणि संशोधनासाठी तसेच विविध उपक्रमांसाठी समर्पित असणारी राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट  ही संस्था तामिळनाडूमध्ये श्रीपेरींमबुदुर येथे कार्यरत आहे. या संस्थेने वर्षभरात विविध उपक्रम राबवले.

संस्थेतर्फे भारतीय युवा विकास निर्देशांक  आणि अहवाल 2017 प्रकाशित करण्यात आला. युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते 13 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत या अहवालाचे प्रकाशन झाले.

संस्थेने आयोजित केलेल्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये 190 विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले तसेच संस्थेने 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून युवा विकास विषयक एका वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला.

आंतरराष्ट्रीय सहकार्य

देशातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध घडामोंडीची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय युवा आदान-प्रदान उपक्रम राबविण्यात आले. त्यानुसार एप्रिल महिन्यात व्हिएतनामच्या 10 विद्यार्थ्यांनी तर नेपाळच्या 50 विद्यार्थ्यांनी भारताला भेट दिली. भारतीय युवकांच्या चार सदस्यीय गटाने बहरीन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत सहभाग नोंदवला.

अशा प्रकारचे अनेक उपक्रम मे, जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही राबविण्यात आले त्याअंतर्गंत दक्षिण कोरिया, प्लॅस्टाईन, श्रीलंका आणि चीनमधील विद्यार्थी प्रतिनिधींनी भारताला भेट दिली. तसेच विविध भारतीय प्रतिनिधींनी चीन, युगांडा, रशिया अशा देशांना भेट दिली.

नॅशनल प्रोग्रॅम फॉर युथ अँड अडोल्संट डेव्हलपमेंट (एनपीवायएडी)

देशभरातील किशोरवयीन आणि युवकांसाठी  विशेष उपक्रम राबविण्यासाठी शासकीय आणि खाजगी संस्थांना सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी नॅशनल प्रोग्रॅम फॉर युथ अँड अडोल्संट डेव्हलपमेंट कार्यरत आहे.

याअंतर्गंत 2017-18 या आर्थिक वर्षात 15 स्वयंसेवी  संघटनांना वित्त सहाय्य देण्यात आले.  28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सिक्कीममध्ये गंगटोक येथे पाचव्या ईशान्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

राजस्थानमध्ये जयपूर येथे येत्या 12 ते 16 जानेवारी दरम्यान 22 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच साहसी कृत्य करणाऱ्या चार विजेत्यांना यावर्षी तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नॅशनल यंग लिडर्स प्रोग्रॅम  (एनवायएलपी)

देशातील युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी डिसेंबर 2014 मध्ये नॅशनल यंग लिडर्स प्रोग्रॅम  हा उपक्रम सादर करण्यात आला.  त्याअंतर्गंत चालू वर्षात नेबर हूड युथ पार्लमेंट शीर्षकांतर्गंत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात 1,76,000 युवकांनी चर्चा आणि संवाद स्वरुपाच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. ग्रामीण स्तरावर 23,255 उपक्रम राबविण्यात आले, ज्यात गावातील 2,92,000 युवक युवती सहभागी झाले.  21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित उपक्रमांनाही युवा वर्गाचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

यूथ फॉर डेव्हलपमेंट या कार्यक्रमांतर्गंत श्रमदान  विषयक उपक्रम राबविण्यात आले.  यात असामान्य  कामगिरी करणाऱ्या गटाचा सत्कारही करण्यात आला.

यूथ हॉस्टेल्स

देशातील युवा वर्गाला प्रवास करण्यासाठी आणि देशाचा समृध्द, सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यूथ हॉस्टेलचा हेतू आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम आहे. यूथ हॉस्टेलच्या माध्यमातून युवकांना वाजवी दरात निवासाची चांगली सोय उपलब्ध करुन दिली जाते.  देशभरात अशाप्रकारची 83 यूथ हॉस्टेल्स उभारण्यात आली असून अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एका युथ हॉस्टेलचे काम सुरु आहे तर पणजी, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि पुद्दुचेरी येथील युथ हॉस्टेल्सना आयएसओ 9001 : 2008 प्रमाणन प्राप्त झाले आहे.

 
PIB Release/DL/1933
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau