This Site Content Administered by
युवक कल्‍याण व क्रीडा

2017 वर्षात क्रीडा विभागाने राबविलेले उपक्रम आणि कामगिरी

नवी दिल्ली, 13-12-2017

2017 या वर्षात क्रीडा विभागाने देशभरात राबवलेले उपक्रम आणि कामगिरी यांचे तपशिल पुढीलप्रमाणे :

1)     ट्रेनिंग सेंटर फॉर पॅराॲथलिट – गुजराममध्ये गांधीनगर येथे 5 फेब्रुवारी 2017 रोजी क्रीडा मंत्र्यांनी या प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली. या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

2)    इंटरनॅशनल बॉक्सींग अकॅडमी – नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि रोहतक येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात मुष्टीयुद्ध अकादमी स्थापन करण्यासाठी 1 मार्च 2017 रोजी आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटना, भारतीय मुष्टीयुद्ध महासंघ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

3)    महिला खेळाडूंच्या तक्रारी आणि गाऱ्हाण्यांची दखल घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती- आंतरराष्ट्रीय महिला दिनी 8 मार्च रोजी महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्लीत ‘भारतातील महिला आणि क्रीडा’ या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. महिला खेळाडूंच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.

4)    22 व्या आशियाई ॲथलॅटिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन- ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे 22 व्या आशियाई ॲथलॅटिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत 12 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कांस्य अशा एकूण 29 पदकांची कमाई करत भारत या स्पर्धेत अव्वलस्थानी राहिला.

5)    ग्रामीण मॅरेथॉन – 6 ऑगस्ट रोजी दिल्लीमधील निजामपूर गावात पहिल्या ग्रामीण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 15 हजार युवक-युवती सहभागी झाले.

6)    ग्रामीण खेळ महोत्सव- दिल्लीमधील निजामपूर येथे 28 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधील ग्रामीण खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात कुस्ती आणि ॲथलेटिकसह इतर क्रीडा प्रकारांचा समावेश होत आहे.

7)    स्पोर्ट टॅलेंट सर्च पोर्टलचे उद्‌घाटन- देशभरातील उदयोन्मुख खेळाडूंना हेरून योग्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने स्‍पोर्ट टॅलेंट सर्च पोर्टलचे उद्‌घाटन करण्यात आले. नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित समारंभात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या पोर्टलचे उद्‌घाटन केले.

8)    भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा भागीदारी- क्रीडा क्षेत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये परस्पर संबंध विकसित करण्याच्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान 10 एप्रिल रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया सरकारने पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

9)    सक्षम सुकाणू समिती – आगामी तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू घडविण्यासाठी आराखडा तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सक्षम सुकाणू समितीची स्थापना करायला मंत्रालयाने परवानगी दिली.

10) अभिनव बिंद्रा फाऊंडेशन ट्रस्टला वित्तसहाय्य – बंगळुरू येथे पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट एक्सलंस येथे उच्च दर्जाचे क्रीडा केंद्र उभारण्यासाठी मंत्रालयाने अभिनव बिंद्रा फाऊंडेशन ट्रस्टला 5 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली.

11) उत्कृष्ट ॲथलिटसाठी दरमहा 50 हजार रुपये विद्यावेतन – ऑलिम्पिक कृती दलाच्या शिफारशीनुसार टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेअंतर्गत निवडक ॲथलिटना दरमहा 50 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला.

12) सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम- 2017-18 ते 2019-20 या अवधिसाठी सुधारित क्रीडा इंडिया कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी 1756 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

13) ‘स्पोर्ट फॉर ऑल’विषयक राष्ट्रीय कार्यशाळा- नवी दिल्लीत 26 सप्टेंबर रोजी ‘स्पोर्ट फॉल ऑल’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्य सरकारे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ, भारतीय ऑलिम्पिक संघटना, क्रीडा विभाग, भारतीय क्रीडा प्राधिकरण अशा विविध संस्थांमधून 80 प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले.

14) 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजक – 6 ते 28 ऑक्टोबर या अवधित देशात 17 वर्षांखालील वयोगटासाठीच्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कोलकाता येथे 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनवर मात करत इंग्लंडने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

15) मिशन XI मिलियन – देशभरात फुटबॉल या खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी क्रीडा मंत्रालय, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि फिफाने मिशन XI मिलियन हा उपक्रम संयुक्तपणे राबवला. 30 सप्टेंबर 2017 पर्यंत देशातील 11 दशलक्ष मुले आणि मुलींपर्यंत फुटबॉल हा खेळ पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

16)  मणिपूरमध्ये राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ- 10 जुलै 2014 रोजी वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मणिपूर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली होती. नीती आयोगानेही या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी दिली आहे.

 
PIB Release/DL/1935
बीजी -माधुरी -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau