This Site Content Administered by
वस्‍त्रोद्योग

वर्ष 2017-18 चे वस्त्रनिर्मितीचे उद्दिष्ट 14 अब्ज अमेरिकन डॉलरचे उद्दिष्ट-उज्ज्वल लाहोटी

 


मुंबई, 14-12-2017

वर्ष 2016-17 मध्ये परिषदेच्या सदस्यांनी एकूण 10.7 अब्ज डॉलरची सुती वस्त्रांची निर्यात केली असून यापैकी 3.35 अब्ज कपास यार्न आहेत. तर 2.05 अब्ज अमेरिकन डॉलर कपास फॅब्रीकचा समावेश आहे. वर्ष 2017-18 साठी वस्त्रोद्योग निर्यात परिषदेचे 14 अब्ज अमेरिकन डॉलर निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत टेक्स प्रोसिल अर्थात कपास वस्त्रोद्योग निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष उज्ज्वल लाहोटी यांनी आज टेक्स प्रोसिल 2016-17 च्या पुरस्कारांचे वितरण  कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

भारतात कपास वस्त्रोद्योग उत्पादनात नवीनतम आणि पुरेसे प्रयत्न करून भारतीय उत्पादनाला जागतिक ओळख टेक्स प्रोसिलने करून दिली आहे.  सध्या टेक्स प्रोसिलचे 3000 नोंदणीकृत सभासद असून यार्न, वस्त्र आणि देशांतर्गत वस्त्रोद्योग यामध्ये हे सभासद कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. कविता गुप्ता यांच्या हस्ते टेक्स प्रोसिल 2016-17 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  याप्रसंगी बोलतांना गुप्ता म्हणाल्या की, वस्त्रोद्योग उद्योगाची एकात्मिक मूल्य साखळी बनवण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी वस्त्रोद्योगाद्वारे  करण्यात आली आहे. सध्या वस्त्र निर्यातीत वाढ करण्यासाठी यंत्रमाग क्षेत्रातील उत्पादन निर्मितीवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असून यासाठी आंतरविभागीय सामंजस्य करार आणि आंतरिक करार याद्वारे मूल्याधारित पद्धतीचा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड संलग्नतेत उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाला  टेक्स प्रोसिलचे उपाध्यक्ष डॉ. के.व्ही. श्रीनिवासन उपस्थित होते.

पार्श्वभूमी

1954 ला स्थापन झालेल्या भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कपास, वस्त्रोद्योग निर्यात संवर्धन परिषद अर्थात टेक्स प्रोसिल ने जागतिक पातळीवर भारतीय वस्त्रोद्योग आणि कपास संवर्धनाला प्रोत्साहन देऊन या क्षेत्राला एक विशेष मान्यता मिळवून दिली. टेक्स प्रोसिलचे प्रयत्न मेक इन इंडियाच्या दृष्टीकोनाला साजेसे असल्याने आतापर्यंत भारतात जवळपास 3000 संस्थांनी टेक्स प्रोसिलचे सभासदत्व घेतले आहे. या सर्व सभासदांतर्फे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्त्रोद्योग निर्यात करण्यात येते. सध्या टेक्स प्रोसिलचा उपक्रम वस्त्रोद्योग क्षेत्राला डिजिटल आणि नवीनतम रुप देणे असून जगभरात खरेदी विक्रीदारांच्या समन्वयासाठी टेक्स प्रोसिलचे कर्मचारी व्यापार पोर्टलद्वारे ऑनलाईन सर्व्हिस देण्यात कार्यरत आहेत.  तसेच भारतात निर्यातीसाठी पोषक वातावरण आणि जागतिक बाजारपेठेतील सद्यमाहिती उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. तसेच बाजार संशोधन विविध संघटनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेमधील सहभाग इत्यादींची माहितीसुद्ध पुरवते.

 
PIB Release/MH/269
बीजी -- -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau