This Site Content Administered by
सामाजिक न्‍याय व सक्षमीकरण

कोचेलर इम्प्लांट प्रकल्प- सीएसआर उपक्रम दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी लोकांचा सहभाग आवश्यक- थावरचंद गेहलोत

 


मुंबई, 16-12-2017

केंद्र सरकारचा कोचेलर इम्लंट योजनेअंतर्गतआतापर्यंत 6 वर्षाखालील 100 कर्णबधीर मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून हा एक कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी कॉर्पोरेट जगाच्या सहभागासोबतच लोकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गहलोत यांनी यावेळी मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, पालकांनी अली यावर जग इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना 1 वर्ष स्पिच थेरपीसाठी घेऊन जावे, जेणेकरून ही मुलं उत्तम प्रकारे बोलू शकतील. प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 6 लाख रुपये खर्च येतो. ज्या कुटुंबांना या शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नाही त्यांना मदत करण्यासाठी पॉवर फायनांन्स कॉर्पोरेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. अली यावर जंग इन्स्टिट्यूटने आतापर्यंत 836 कर्णबधीर मुलांना कोचेलऱ   इम्प्लांट शस्त्रक्रिया केली आहे, अशी माहिती गेहलोत यांनी दिली.

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आतापर्यंत 5890 हून अधिक शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांदरम्यान 9 लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात आली आहे, असे गेहलोत यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागाअंतर्गत,  ALIMCO माफक दरात दिव्यांगांना सेवा प्रदान करते. 100 कर्णबधीर मुलांना कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी PFC आणि (ALIMCO) ने 25 जुलै 2016 ला सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

कोचेलऱ इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पालकांनी यावेळी केंद्र सरकार तसेच PFC आणि अलिमको   (ALIMCO) सारख्या संस्थांचे आभार मानले. ज्यांच्या मदतीमुळे कर्णबधीर मुलांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण आला आहे.

 
PIB Release/MH/271
बीजी -म्हात्रे -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau