This Site Content Administered by
विज्ञान व तंत्रज्ञान

आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ मध्ये यंदा प्रणव मुखर्जी आणि हमीद करझाई प्रमुख वक्ते

 


मुंबई, 18-12-2017

आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट आशिया खंडातील सर्वात मोठा वार्षिक विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव आहे. महोत्सवाचे हे यंदाचे 21वे वर्ष असून, 29 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटलायझेशन, शाश्वतता आणि जैवतंत्रज्ञान या यंदाच्या महोत्सवाच्या संकल्पना आहेत.

यंदाच्या महोत्सवात ‘लीडरशिप समिट’ हे प्रमुख आकर्षण असून, यात देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई प्रमुख वक्ते आहेत. माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत विद्यार्थी या नेत्यांशी संवाद साधणार आहेत.

प्रणव मुखर्जी यांचे भाषण 29 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. डिजिटल इंडिया आणि डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे येण्यासाठी अभियंत्यांची भूमिका यावर ते परिषदेत चर्चा करतील.

तर हमीद करझाई यांचे भाषण 31 डिसेंबरला दुपारी दोन वाजता होणार आहे. शाश्वत विकास : नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करुन त्यांचा पुरेपूर वापर आणि 2022 पर्यंत पृथ्वीचे भवितव्य या विषयावर ते बोलणार आहेत.

आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ‘डीआरडीओ’च्या प्रदर्शनाचे आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ या विषयावर ते बोलणार आहेत. तसेच 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता ते ‘स्मार्ट शहरे आणि अभियंत्यांची भूमिका’ या विषयावर चर्चा करणार आहेत.

लीडरशिप समिट अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा ‘भारतीय अर्थव्यवस्थेत युवकांसाठी संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चा करतील. तसेच 29 डिसेंबरला दुपारी चार वाजता ते ‘शाश्वत विकासाचे महत्व’ या विषयावर भाषण देणार आहेत.

देशभरातील 2500 तसेच परदेशातल्या 500 महाविद्यालयांपर्यंत हा महोत्सव विस्तारलेला आहे.

 
PIB Release/MH/273
बीजी -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau