This Site Content Administered by
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

वार्षिक आढावा 2017 : स्वच्छता आणि पेयजल मंत्रालय

नवी दिल्ली, 20-12-2017

स्वच्छ भारत अभियान

सार्वजनिक स्वच्छता वाढीला लागावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 ला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. 2019 मध्ये गांधीजींची 150 वी जयंती आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत आणि हागणदारीमुक्त देशाचे उद्दिष्ट पूर्ण करुन गांधीजींना आदरांजली वाहण्याचे अभियानांतर्गत ठरवण्यात आले आहे.

2 ऑक्टोबर 2014 पर्यंत स्वच्छतेचे प्रमाण 38.70 टक्के होते. 18 डिसेंबर 2017 पर्यंत ते वाढून 74.15 टक्के पोहचले. परंतु अजूनही वर्तनात बदल होणे आवश्यक असून, त्या अनुषंगाने लोकशिक्षणाचे उपक्रम मंत्रालय राबवत आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

 

स्वच्छ भारत अभियान : स्वच्छता हे प्रत्येकाचे व्रत

स्वच्छता हे प्रत्येकाचे व्रत असले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छता आणि पेयजल मंत्रालय, इतर सर्व मंत्रालयांसोबत, राज्य सरकारांसोबत, स्थानिक संस्थांसोबत, बिगर सरकारी संस्थांसोबत, प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व संबंधित घटकांसोबत सातत्याने काम करत आहे. या सर्वांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

 

स्वच्छता पंधरवडा

केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभागांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृतीसाठी स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो. एप्रिल 2016 मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

नमामि गंगे

गंगेच्या काठावरची गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी जलस्रोत मंत्रालयाने नमामि गंगे अंतर्गत विशेष उपक्रम राबवला. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या 52 जिल्ह्यातली सर्व 4,470 गावे राज्य सरकारांच्या मदतीने हागणदारीमुक्त करण्यात आली. आता गंगेच्या काठावरील 24 गावांचे गंगा ग्राममध्ये रुपांतर करण्याचे काम मंत्रालयाने हाती घेतले आहे.

स्वच्छतेसाठी स्वच्छता कृती आराखडा हा आंतरमंत्रालयीन उपक्रम आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. पंतप्रधानांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वच केंद्रीय मंत्रालये / विभागांनी पुढाकार घेतला. 2017-18 या वित्त वर्षात 77 मंत्रालये / विभागांनी आपल्या स्वच्छता कृती आराखड्यांसाठी 12468.62 कोटी रुपयांची तरतूद केली. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून सुरु झाली.

 

स्वच्छ आयकॉनिक ठिकाणे

पंतप्रधानांनी दिलेल्या प्रेरणेनुसार मंत्रालयाने देशातल्या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या, ऐतिहासिक वारसा असलेल्या महत्वाच्या 100 स्थळांची स्वच्छता हाती घेतली. शहर विकास, पर्यटन आणि संस्कृती या मंत्रालयाच्या सहकार्याने या स्थळांच्या स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत पहिल्या दोन टप्प्यात 20 स्थळे हाती घेण्यात आली.

 

स्वच्छ शक्ती, 8 मार्च 2017

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2017 रोजी गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात स्वच्छ शक्तीचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी महिलांना संबोधित केले. देशभरातल्या सुमारे 6000 निवडक सरपंच, कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. ग्रामीण भागात स्वच्छतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वच्छतादूतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

हागणदारीमुक्त भारतासाठी आठवडा (9 ऑगस्ट-15 ऑगस्ट)

लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी जनजागृतीसाठी दारोदारी प्रचार, स्वच्छता रथ, रॅली, मॅरेथॉन, प्रश्नमंजुषा / चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 

स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी स्पर्धा (17 ऑगस्ट-8 सप्टेंबर)

वर्ष 2022 पर्यंत नवभारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘संकल्प से सिद्धी’ नारा पंतप्रधानांनी दिला आहे. याअंतर्गत स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी यासाठी मंत्रालयाने 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत देशभरात चित्रपट, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले.

 

दरवाजा बंद अभियान

उघड्यावर शौचाला बसण्याच्या सवयीला आळा घालून शौचालयांचा वापर वाढीला लागावा यासाठी वर्तनात विशेषत: पुरुषांच्या वर्तनात बदल घडवण्याकरिता ‘दरवाजा बंद’ अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. हिंदीसह 9 भाषांमध्ये हे प्रचार अभियान राबवण्यात आले.

 

स्वच्छता ही सेवा 16 सप्टेंबर-2 ऑक्टोबर 2017

            27 ऑगस्ट 2017 च्या मन की बातमध्ये, स्वच्छतेसाठी प्रेरणा जागवण्याचे, श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी, राजकीय नेते, कॉर्पोरेट क्षेत्र, सरकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सरपंचांना केले. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत यासाठी मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: वाराणसीतल्या शहेनशहापूर गावात शौचालय बांधणीसाठी श्रमदान केले. ‘स्वच्छता हा स्वभाव’ झाला पाहिजे, देश स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या मोहिमेला उदंड प्रतिसाद लाभला. स्वच्छतेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात श्रमदान झाले. लष्कर आणि दिव्यांग व्यक्तींनीही यात भाग घेतला.

 
PIB Release/DL/2002
बीजी -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau