This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

वार्षिक आढावा 2017 : माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नवी दिल्ली, 19-12-2017

माहिती आणि प्रसारण मंत्रालयावर माहिती, शिक्षण आणि मनोरंजन अशी जबाबदारी असून, यासंदर्भातली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले. माहिती क्षेत्रात इथिओपियासह आंतरराष्ट्रीय सहकार्य, 360 डिग्री मल्टिमिडिया कॅम्पेन्स, ‘प्रेस इन इंडिया’ या आरएनआयच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन, असे विविध उपक्रम झाले. त्याचप्रमाणे फिल्म्स क्षेत्रात 48व्या इफ्फी महोत्सवाची यशस्वी सांगता, तर प्रसारण क्षेत्रात झारखंडसाठी 24 तास दूरदर्शन वाहिनीची सुरुवात या महत्वाच्या घटना होत्या. विविध क्षेत्रात मंत्रालयाने हाती घेतलेले उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

 

माहिती क्षेत्र

Ø  प्रकाशन विभाग आणि सास्ता साहित्य मंडळ यांच्यात पुस्तकांचे संयुक्त प्रकाशन, देशाच्या समृद्ध आणि विविधरंगी संस्कृतीबाबत व इतिहासाबाबत तरुणांना जागृत करणे यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यामुळे विविध विषयांवर लोकांना उत्तम साहित्य उपलब्ध होण्यासाठी चालना मिळेल.

Ø  भारत आणि इथिओपिया यांच्यात माहिती, दळणवळण आणि माध्यमे यातील सहकार्यासंबंधात करार झाला. या करारामुळे रेडिओ, मुद्रित माध्यमे, टिव्ही, सोशल मिडिया इत्यादी जनसंपर्क साधनांमध्ये दोन्ही देशातील नागरिकांना अधिक संधी पुरवणे आणि सामाजिक जबाबदारीचे भान आणणे यासाठी चालना मिळेल.

Ø  आंतरराष्ट्रीय योग दिवस, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, राष्ट्रीय एकता दिवस यासाठी 360 डिग्री मल्टिमीडिया प्रचारमोहिमा सुरु करता आल्या. या अंतर्गत मल्टिमीडिया प्रदर्शने, इन्फोग्राफिक्स, ॲनिमेशन्स, ग्राफिक प्लेटस, लघू चित्रफिती, कार्यक्रमे / परिषदांचे थेट प्रसारण यांचा समावेश आहे.

Ø  6व्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले. रघू राय यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वर्षीचा व्यावसायिक छायाचित्रकार पुरस्कार के.के.मुस्तफा यांना, तर हौशी छायाचित्रकार पुरस्कार रवींदर कुमार यांना देण्यात आला.

Ø  चंपारण्य सत्याग्रहाच्या शतकमहोत्सवी समारंभानिमित्त 3 सांस्कृतिक वारसा पुस्तकांचे प्रकाशन झाले.

Ø  मुलांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी यासाठी ‘स्वच्छ जंगल की कहानी – दादी की जुबानी’ हा पुस्तकांचा संच प्रकाशन विभागातर्फे 15 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आला.

Ø  सरकारने गेल्या 3 वर्षात विविध क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचे दर्शन घडवणारे ‘साथ है विश्वास है, हो रहा विकास है’ हे 5-7 दिवसांचे प्रदर्शन राज्यांच्या राजधानीच्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले.

Ø  महात्मा गांधींच्या संग्रहित लेखांचे 100 खंड प्रकाशित करण्यात आले. 1884 ते 30 जानेवारी 1948 या कालावधीतले गांधीजींचे विचार यात स्मरणरुपाने जतन करण्यात आले आहेत.

Ø  नव्या करव्यवस्थेबाबतची माहिती एकाच मंचावर उपलब्ध व्हावी, यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर वस्तू आणि सेवा कराबाबत http://pib.nic.in/gst हे विशेष संकेतस्थळ निर्माण करण्यात आले.

Ø  आरएनआय वार्षिक अहवाल – मुद्रित माध्यमाबाबत महत्वाची माहिती असलेल्या ‘प्रेस इन इंडिया’चे प्रकाशन करण्यात आले. उद्योगाच्या विशेषत: प्रादेशिक भाषेतील प्रकाशनाच्या वाढीबाबतची रुपरेषा, समग्र विश्लेषण या अहवालात देण्यात आले आहे.

 

प्रसारण क्षेत्र

Ø  शहरी क्षेत्रातल्या तिसऱ्या टप्प्यात ॲनॅलॉग सिग्नल्स बंद करण्यात आले.

Ø  डिजिटल रेडिओ गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. डिजिटल रेडिओ तंत्रज्ञानामुळे श्राव्य गुणवत्तेत बरीच सुधारणा होते आणि परवडणाऱ्या किमतीत विश्वासार्ह सेवा देता येते. आकाशवाणीने रेडिओ प्रसारणाच्या डिजिटाइझेशनच्या पहिल्या टप्प्यात तांत्रिक उभारणी आणि 37 शक्तिशाली ट्रान्समीटर्सचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले आहे.

Ø  सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल आणि त्यामुळे देशात झालेले बदल याबाबतच्या यशोगाथांवर दूरदर्शनने 14 लघुपटांची निर्मिती केली.

Ø  झारखंडसाठी वेगळ्या 24 तास दूरदर्शन वाहिनीची घोषणा करण्यात आली. तोपर्यंत डीडी बिहारवरुन डीडी रांचीचे कार्यक्रम प्रसारित व्हायचे.

Ø  अफगाणिस्तान-पाकिस्तान सरहद क्षेत्रासाठी 100kw च्या 2 नव्या लघुलहरी सॉलिड स्टेट डिजिटल ट्रान्समीटर्सची घोषणा करण्यात आली.

Ø  डीडी न्यूजचे संकेतस्थळ नव्या रुपात करण्यात आले.

Ø  सरदार पटेल स्मृति व्याख्यानमाला 2017चे आयोजन करण्यात आले.

 

चित्रपट क्षेत्र

Ø  दिल्लीत भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्‌घाटन ‘इमा सावित्री’ या माहितीपटाने आणि हिंदी चित्रपट ‘पिंकी ब्यूटी पार्लर’ने झाले. ओम पुरी यांच्या स्मरणार्थ त्यांनी अभिनय केलेल पाच महत्वाचे चित्रपट दाखवण्यात आले.

Ø  राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेंतर्गत ‘फिल्म कण्डिशन ॲसेसमेंट’ उपक्रम सुरु करण्यात आला. चित्रपट संवर्धनासाठी हा जगातला एकमेव प्रकल्प असून, यामुळे चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात एनएफएआयमधल्या सुमारे 1,32,000 चित्रपट रिळांची स्थिती तपासणी झाली आणि प्रत्येक चित्रपट रिळाचा आरएफआयडी टॅगिंगद्वारे माग ठेवला जाईल.

Ø  पुण्यातल्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज ऑफ इंडियामध्ये ईशान्य भारतातील चित्रपटांचा ‘फ्रॅग्रन्सेस फ्रॉम दी नॉर्थ ईस्ट’ हा महोत्सव आयोजित करण्यात आला. गोव्यातल्या इफ्फी महोत्सवात सहभागी होण्यासाठी ईशान्य भारतातल्या 10 चित्रपट निर्मात्यांना प्रथमच साहाय्य करण्यात आले.

Ø  दिल्लीमध्ये भोजपुरी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कब होई गवाँ हमार’ या चित्रपटाचा समावेश होता. इफ्फीमध्ये भारतीय चित्रपट गटात नितीन चंद्रा आणि मंगेश जोशी यांचे दोन भोजपुरी चित्रपट दाखवण्यात आले.

Ø  चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून भारत आणि युक्रेन द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणार आहेत.

Ø  चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील लघू अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी एफटीआयआय आणि कॅनन यांच्यात सामंजस्य करार झाला. तंत्रज्ञानविषयक भागीदार म्हणून कौशल्याभिमुख अभ्यासक्रमात कॅननचे साहाय्य लाभले आहे. राज्य सरकारे, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या साहाय्याने या लघू अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

Ø  परदेशी चित्रपट निर्मात्यांना देशता सुकर प्रवेश मिळावा यासाठी नवीन वर्गवारीतल्या व्हिजाची निर्मिती करण्यात आली. चित्रिकरणासाठी भारत जगातले आकर्षक स्थळ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Ø  दिल्लीत 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘कासव’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. रुस्तुम या चित्रपटासाठी अक्षयकुमारला सर्वोत्तम अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री सुरभी सर्वोत्तम अभिनेत्री ठरली. व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटासाठी राजेश मापुस्कर यांना सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले.

Ø  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते कसीनाधुनी विश्वनाथ 2016च्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी ठरले.

Ø  48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे, इफ्फी 2017 आयोजन गोव्यात करण्यात आले. 82 देशातले 196 चित्रपट यावेळी दाखवण्यात आले. 3 चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमीअर झाले. ऑस्करसाठी प्रवेश दाखल केलेले 28 हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. महोत्सवात प्रथमच जेम्स बॉण्ड पट दाखवण्यात आले. ॲटॉम इगोयान यांना जीवनगौरव पुरस्काराने सनमानित करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सोनॅलिटी ऑफ द इअर’ने सन्मानित करण्यात आले.

Ø  माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांसाठीच्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-‘मिफ्फ 2018’ ला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. सुवर्ण आणि रौपय शंख पुरस्कारांसाठीच्या स्पर्धेत 792 पट आहेत. महोत्सवाचे उद्‌घाटन मुंबईत एनसीपीए इथे 28 जानेवारी 2018ला होणार आहे.

 

 
PIB Release/DL/2011
सप्रे -सो.कु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau