This Site Content Administered by
सामाजिक न्‍याय व सक्षमीकरण

वर्ष 2017 मध्ये 619 एडीआयपी शिबारांचे आयोजन आणि 1 लाखांहून अधिक दिव्यांगजनांना मदत आणि सहायक उपकरणे प्रदान केली
 

यावर्षी 934मोटारयुक्त तिचाकी प्रदान केल्या तसेच 296 कोचलर प्रत्यारोपण सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या


पीडब्लूडीएससाठी राष्ट्रीय महिती तयार करणे आणि त्यांना विशिष्ट ओळख पत्र प्रदान करण्यासाठी डीईपीडब्ल्यूडी युडीआयडीद्वारे प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे


नवी दिल्ली, 18-12-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजकोट सामाजिक अधिकारिता शिबिरात सर्वाधिक दिव्यांगजनांना मदत आणि सहायक उपकरणे प्रदान

 

राजकोटचे जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने अलीमको, कानपूरच्या माध्यमातून दिव्यांगजन साश्क्तीकरण विभागाने राजकोट (कानपूर) येथे दिव्यांगजनांना मदत आणि सहायक उपकरणे प्रदान करण्यासाठी सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन रेस कोर्स ग्राऊंड, राजकोट, गुजरात येथे आयोजित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणे प्रदान करण्यात आली.

राजकोट शिबिरामध्ये 17589 दिव्यांग व्यक्तींना 11.19 कोटी रुपयांची मदत आणि सहायक उपकरणे प्रदान करण्यात आली, यामध्ये 3000 लाभधारक असे आहेत ज्यांना 1.53 कोटी रुपयांची मदतआणि सहायक उपकरणे राज्य सरकारकडून प्रदान करण्यात आली. देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे शिबीर आहे जिथे इतक्या मोठ्या संख्येने एकाच शिबिरात  दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणे प्रदान करण्यात आली. 

या कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार 90 मोटारयुक्त तिचाकी, 1960 तिचाकी, 1541 व्हीलचेअर, 77 सेरेब्रल पाल्सी चेअर, 2896 कुबड्या, 3095 काठ्या, 529 ब्रैल केन, 112 रोलाटर, 162 ब्रेल कीट, 732 स्मार्ट केन, 214स्मार्ट फोन स्क्रीन रीडरसह, 68 डेजी प्लेयर, कृष्टरोग्यांसाठी 20 एडीएल कीट, 2206 डिजिटल श्रवण यंत्र, 1101 कृत्रिम अवयव आणि कॅलिपर, 4416 टीएमएल कीट आणि बौद्धिक विकलांगता असलेल्या व्यक्तींसाठी 73 लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. राज्य सरकारने देखील अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि पुनर्वसनासाठी उपकरणे वितरीत केली.

या कार्यक्रमाशी संबंधित 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहेत. 28 जून 2017 ला श्रवण दोष असलेल्या 1442 व्यक्ती एकाच ठिकाणी एकत्रित येवून त्यांनी सांकेतिक भाषेतून राष्ट्रगीत सादर केले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग आहे, याआधी तैवान(चीन) येथे 978 कर्णबधीर व्यक्ती एकत्र येवून असा रेकॉर्ड केला होता. या सर्व सहभागींनी पंतप्रधानांन समोर पुन्हा एकदा हे सादरीकरण केले होते.

एकाच दिवशी 781 गतिमंद व्यक्तींना कॅलिपर्स बसवण्यात आले हा दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन करण्यात आला.

वरील दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस व्यतिरिक्त, एक नवीन 'वर्ल्ड बुक रेकॉर्डे'देखील झाला आहे, एका दिवसात, एका ठिकाणी, दिव्यांग व्यक्तिंसाठी मदत आणि उपकरणे वितरीत करण्यात आली. यामध्ये 17589 दिव्यांग सहभागी झाले होते. या श्रेणीतील हा जगातील सर्वात मोठा सहभाग आहे.

 

Orthosis (Calipers)

 

Guinness Book of World records presented to Prime Minister during Mega camp held at Rajkoat  

 

याआधी, ऑगस्ट 2016 मध्ये वाराणसी, नवसारी आणि वडोदरा येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत अशाप्रकारच्या महा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनुक्रमे 10000, 11000 आणि 10500 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला होता..

 

विशिष्ट अपंगत्व ओळख (युडीआयडी) प्रकल्प

 अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय डेटा-बेस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्यातील प्रत्येकाला विशिष्ट ओळख पत्र जारी करण्यासाठी विभाग UDID प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. त्यानंतर ग्रामस्तरावर, जिल्हा पातळीवर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यास मदत करेल. आतापर्यंत 12 राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सुमारे 318 जिल्ह्यांतील 2.74लाख अपंगत्व प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्डांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे.यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, झारखंड, राजस्थान, अंदमान आणि निकोबार बेटे आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.

 

अपंगव्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार-2017 राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्ती जागतिक दिनाचे औचित्य साधत 3 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपतींनी पुरस्कारप्राप्त विजेत्यांना अपंगव्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार-2017 प्रदान केले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री  थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्णन पाल गुर्जर आणि रामदास आठवले याप्रसंगी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्ती जागतिक दिना दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगव्यक्ती सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य/जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

 

सुगम्य भारत अभियान महत्वपूर्ण कामगिरी/टप्पे

 दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, पर्यावरण प्रणालीमध्ये जागतिक सुगम्यता प्रदान करण्याच्या उद्देशाने 3 डिसेंबर 2015 रोजी सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत, लेखापरीक्षकांनी 50 शहरातील 1662 इमारतींचे प्रवेश लेखापरीक्षण केले आहे. सर्व 34आंतरराष्ट्रीय आणि सर्व 48 देशांतर्गत विमानतळांवर रॅम्प्स, प्रवेशयोग्य शौचालय, ब्रेल चिन्ह आणि श्रवण संकेतांसह लिफ्ट इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 709 ए1, , बी श्रेणीतल्या रेल्वे स्थानकांपैकी 644रेल्वे स्थाकांवर आणि 1,41,572 बसपैकी 12,894बसमध्ये देखील दिव्यांगांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांच्या 917 संकेतस्थळांना ईआरनेटच्या माध्यमातून सुलभ करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

एआयसी कामगिरी

गुरुवार 2 नोव्हेंबर 2017 रोजी बालभवन,नवी दिल्ली येथे  विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी  दिव्यांगव्यक्तींसाठी सुलभता या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. अंदाजे 1200 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना 14नोव्हेंबर 2017 रोजी प्रवासी भारतीय केंद्र, नवी दिल्ली येथे माननीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आणि माननीय सामजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

9 नोव्हेंबर 2017 रोजी चित्रपट महोत्सव संचलनालय यांच्या सहकार्याने विभागाने दिव्यांगजन सक्षमीकरण लघु चित्रपट स्पर्धेचा प्रस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. एकूण 10 पुरस्कारप्राप्त व्यक्तींना माहितीपट, लघुपट आणि टिव्ही स्पॉट या श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यांनी सिरी फोर्ट ऑडिटोरियम, नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.

 

डीईपीडब्ल्यूडीच्या इतर कामगिरी 

 ·     पीडब्ल्यूडीएसच्या कौशल्य विकासासाठी धोरणाची अंमलबजावणी आणि कृती आराखडा निश्चित करण्यासाठी, नवी दिल्लीमध्ये 3 फेब्रुवारी रोजी, अपंग लोकांसाठी कौशल्य विकासावर एक राष्ट्रीय सल्लागार कार्यशाळा  आयोजित करण्यात आली  होती. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्यात बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्वावरही भर देण्यात आला.

·     एम्स, नवी दिल्लीच्या बालरोगचिकित्सक विभाग, बाल न्यूरॉलॉजी विभागाच्या मदतीने, नॅशनल ट्रस्टने ऑटिझम टूल्समधील प्रशिक्षण मास्टर ट्रेनर्ससाठी  9 फेब्रुवारी 2017 ते 11 फेब्रुवारी 2017 पर्यंत, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे.दुसऱ्या  3  दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

·     22 फेब्रुवारीला मंत्र्यांच्या उपस्थितीत दिव्यांग युवकांसाठी असलेल्या जागतिक माहिती तंत्रज्ञान आव्हान 2016 च्या विजेत्या संघांना आणि 28 फेब्रुवारीला टी-20 अंध विश्व चषक विजेत्या संघाला पंतप्रधानांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

·     विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने 20 ते 21 मार्च 2017 दरम्यान विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारतीय सांकेतिक भाषेद्वारे कर्णबधिरांचे सक्षमीकरण या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. कर्णबधीर आणि भारतीय सांकेतिक भाषा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांना त्यांच्या अनुभव कथनासाठी एक सामाईक व्यासपीठ मिळावे या मुख्य उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय सामजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहेलोत यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. 

·     नॅशनल ट्रस्टने 25 मार्च 2017 रोजी प्रवासी भारतीय केंद्र, नवी दिल्ली येथे,जागतिक ऑटिझम दिनाशी संबंधीत  डाऊन सिंड्रोमवर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे उद्घाटन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण थावरचंद गेहेलोत यांनी केले.

 

विभागातील महत्वाच्या योजना / कार्यक्रमांची चर्चा करण्यासाठी खालील पाच विभागीय क्षेत्रीय संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते: -

I.          पश्चिम क्षेत्रीय परिषदेचे आयोजन मुंबईत 11 मे 2017 रोजी करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दिव, दादर आणि नगर हवेली हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते;

II.         दक्षिण क्षेत्रीय परिषदेचे आयोजन चेन्नईत 12 मे 2017 रोजी करण्यात आले. यामध्ये तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.

III.        26 मे 2017 रोजी उत्तर क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि चंदीगड हे राज्य सहभागी झाले.

IV.       केंद्रीय प्रादेशिक परिषद आणि पूर्व क्षेत्रीय परिषद अनुक्रमे 2 जून 2017 आणि 9 जून 2017 रोजी भोपाळ आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओडिशा, सिक्किम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल हे राज्य यात सहभागी झाले होते..

           

या परिषदेमध्ये  सुगम्य भारत अभियान(एआयसी), डीबीटीची ओळख, विशिष्ट अपंगत्व ओळखपत्र (यूडीआयडी) यासारख्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला गेला. याव्यतिरिक्त, नवीन कायद्याची ठळक वैशिष्ठ्ये, त्याखाली असलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रभावी अंमलबजावणीच्या आवश्यकतेबद्दल राज्यांना जागरूक करण्यात आले.

·      13-19 वर्षे वयोगटातील दिव्यांग युवकांकारिता अंधत्व, कर्णबधीरता, हालचाल अपंगत्व आणि विकास अपंगत्व या श्रेणींमध्ये 20-21 जुलै, 2017 रोजी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुरुक्षेत्र यांच्या सहकार्याने राष्ट्रीय आयटी चॅलेंज आयोजित करण्यात आला होते. या स्पर्धेतील विजेत्यांना 18-22 सप्टेंबर 2017 रोजी हनोई, व्हिएतनाम येथे झालेल्या ग्लोबल आयटी चॅलेंज 2017 मध्ये भाग घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते   . दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत कोरियन सोसायटी दरवर्षी आशिया-प्रशांत देशांमध्ये जागतिक आयटी चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करते.

·      देशातील सर्वसमावेशक भारत उपक्रमांना लोकप्रिय करण्यासाठी, नॅशनल ट्रस्टने 12 सप्टेंबर 2017 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 'सर्वसमावेशक भारत शिखर परिषद 2017' आयोजित केली होती. या परिषदेचा उद्देश देशातील विविध क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणणे आणि बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असणाऱ्या  व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूआयडीडीज) भारताला एक सर्वसमावेशक राष्ट्र म्हणून बदलण्यासाठी त्यांची वचनबद्धता घेणे 

·      बहु अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने भारतीय पुनर्वसन परिषदेने 9 सप्टेंबर 2017 रोजी चेन्नई येथे एआयसीसीएम: दक्षिण क्षेत्र-2017 चे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला 120हुन अधिक पुनर्वसन व्यावसायिक उपस्थित होते.

 
PIB Release/DL/2013
बीजी -म्हात्रे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau