This Site Content Administered by
उपराष्ट्रपती

सुप्रसिद्ध गायिका पूर्णिमा श्रेष्ठ आणि स्वर्गीय श्रीकांत ठाकरे, 'मोहम्मद रफी पुरस्कार 2017 ने सन्मानित

 


मुंबई, 24-12-2017

'तेरा मुझसे है पाहिले का नाता कोई यू हि नही दिल लगाता कोई किंवा, 'मम्मी को पापा से प्यार है' अशा बाल गीतांपासून ते तू तू तू तू तू तारा, खो गया दिल बेचारा अशा अनेक गाण्यांनी रसिकांना संगीताचा आनंद देणाऱ्या सुषमा श्रेष्ठ यांनां यावर्षीच्या मोहम्मद रफी 2017 तर अनेक  मराठी, हिंदी आणि अन्य भाषांच्या  गाण्यांना  स्वशैलीचा  छाप  पाडून संगीत  दिलेल्या  स्वर्गीय  श्रीकांतजी  ठाकरे यांनां मोहम्मद  रफी  जीवन  गौरव पुरस्काराने  मुंबई  येथे  आयोजित  एका  कार्यक्रमात    भारताचे  उप राष्ट्रपती वेंकय्या  नायडू  यांच्या  हस्ते   सन्मानित   करण्यात  आले. स्वर्गीय  श्रीकांत  ठाकरे  यांच्या  वतीने  त्यांच्या सुविद्य  पत्नी  मधुवंती  यांनी  हा  पुरस्कार  स्वीकारला

 हा  पुरस्कार  'स्पंदन' या  संस्थे तर्फे दरवर्षी  संगीत  क्षेत्रात  अद्वितीय  योगदान  देणाऱ्या  कलाकारांना  देण्यात  येतो.

यावेळी  बोलतांना  वेंकय्या  नायडू  म्हणाले  कीसंगीत  हे  असे  क्षेत्र आहे  जे  केवळ  माणसालाच  नाही   तर सृष्टीतील जीव  जंतूंना  आनंद  उपभोगण्याचे  साधन  म्हणून  उपयोगी  पडते. मरणासन्न  माणसाला  जर  संगीत  ऐकविले  तर  त्याची  पुनर्रर्जीवनाची  प्रक्रिया  चालू  होते. संगीत  हे  माणसा  माणसाला जोडण्याचे काम  करते . ते  पुढे म्हणाले  की, गीत संगीत या मुळे  विविध  धर्मांमधील  अंतर  कमी  होऊन राष्ट्रीय एकात्मता  वाढीस  लागते.  स्वर्गीय  मोहम्मद  रफी  हे  ईश्वरी  वरदान  प्राप्त  झालेले  अलौकिक  गायक  होते.

मोहमद  रफींच्या  कार्यजीवनाचा  आढावा  घेताना  नायडू म्हणाले  कीजवळपास  ७४००  गाणी  विविध भाषानमधून  गाणाऱ्या  या  कलाकाराने   एक संस्कृती  जपणारा  माणूस  म्हणूनही  नाव  कमावले  आहे. त्यांची गाणी  अजरामर  असून  येणाऱ्या  कित्येक  पिढयांना  या  गाण्यांचा  लाभ  घेता  येईल.

महाराष्ट्राचे  राज्यपाल चे. विद्यासागर  राव  यांनी   सांगितले  की, स्वर्गीय   मोहमद  रफींची  93 वी  जयंती आज  साजरी  करतांना, प्रत्येकाने  त्यांनी  आपल्या संगीत  कलेद्वारे  जपलेल्या  'सामाजिक एकात्मताआणि 'संस्कृतीचाविचार  करायला  पाहिजे.  मुंबई  नगरी बद्दल  विशेषतः  बांद्रा  येथे  वास्तव्यास असलेल्या कलाकारानं   बद्दल  बोलतांना राव यांनी  देशाचे  एकूण कलाकार  आणि मुंबईत  वास्तव्य  करत असलेल्या कलाकारांची  तुलना  केली.  सर्वाधिक  कलाकार  बांद्रा  येथे  वास्तव्यास  असल्याचे  त्यांनी  सांगितले. 

 

 

 

 

बी.  गोखले

 
PIB Release/MH/275

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES

Requested Page Not Found ---

This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau