This Site Content Administered by
अणु ऊर्जा

वार्षिक आढावा-२०१७ : अणु ऊर्जा विभाग

नवी दिल्ली, 22-12-2017

·         कुडनकुलम अणु ऊर्जा प्रकल्पाच्या (केकेएनपीपी) दुसऱ्या युनिटचे (1000 मेगावॅट) व्यावसायिक क्रियान्वयन 31 मार्च 2017 पासून सुरु झाले. हे युनिट सुरु झाल्यानंतर, स्थापित अणुऊर्जा क्षमता 6780 मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.

 

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प (युनिटस् 1, 2)

 

·         भारत सरकारने फ्लीट मोडमध्ये 700 मेगावॅटच्या 10 स्थानिक पीएचडब्लूआर बांधकामासाठी आणि कुडनकुलममध्ये आणखी दोन अणुभट्टी स्थापन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. या उपक्रमाद्वारे मागणी पूर्ण करण्यामध्ये, उच्च तंत्रज्ञान उद्योग पुनरुज्जीवीत करायला  खूप मदत होईल.

·         29 जून  2017 रोजी केकेएनपीपी युनिट 3 आणि 4 चे  बांधकाम सुरु झाले.

 

·         प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी (पीएफबीआर) समोर, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, त्याला कार्यान्वित करण्यासंदर्भातील सुरक्षेच्या सर्व बाबी पूर्ण करण्याचे काम प्रगती पथावर आहे.

 

पीएफबीआरचे दृश्य

 

·         दोन पूरक करारांसह, भारताने या वर्षी एप्रिलमध्ये बांग्लादेशसह नागरी परमाणू सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. बांग्लादेशातील रुपपुर अणुऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी आम्ही आपल्या रशियन आणि बांगलादेशी सहकाऱ्यांसोबत सहकार्य करीत आहोत.

 

·         डीएई ने विकसित केलेले 4.6 मीटर लांबीचे शिप बोर्न टर्मिनल (एसबीटी) एका जहाजावर स्थापित करण्यात येऊन खोल समुद्रात तैनात करण्यात आले. एसएबीटीने 23 जून 2017 रोजी कॉर्टोसॅट -2 ई मिशन दरम्यान इस्रो ने प्रक्षेपित केलेला प्रक्षेपक पीएसएलव्ही-सी 38 चे निरीक्षण केले होते.

 

शिप बोर्न टर्मिनल (एसबीटी)

 

·         9 जुलै, 2017 रोजी बाबा बैद्यनाथ मंदिर, देवगड (झारखंड) येथील पवित्र शिव गंगा तलावात, 1000 मीटर क्यूबिक वॉटर शुध्दीकरण संयंत्र कार्यन्वित करून त्याचे उदघाटन केले. आयएस 2296 नुसार हे संयंत्र बाह्य स्नानाला वापरासाठी मानकायोग्य पाणी उपलब्ध करून देत आहे.

·         कर्करोगग्रस्त रोग्यांच्या उपचारासाठी डीएईने देशभरात 6 अतिरिक्त सुविधांची निर्मिती / सुधारणा करून आपल्या कामाची व्याप्ती  वाढवली आहे. यामुळे पुढील चार-पाच वर्षांत सध्याच्या 70,000 रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीने नवीन रुग्णांच्या उपचारांमध्ये मदत होईल.

 

 

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई

होमी भाभा कर्करोग हॉस्पिटल, संगरूर

 

·         डीईए ने कमी किंमतीची 12- चॅनल टेली- ईसीजी मशीन विकसित केली आहे, जी एकाचवेळी सर्व १२ ईसीजी चॅनलची नोंद करते आणि पुढील वैद्यकीय सल्ल्यासाठी तयार केलेला अहवाल डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवते. हे मशीन दूरगामी ग्रामीण भागात निदान करण्याच्या हेतूने योग्य आहे, यामुळे रोग्याला निदान केंद्रात घेऊन जाण्याचा वेळ वाचवते.

 

12 चॅनेल टेली-ईसीजी उपकरण

 

 

15 ऑगस्ट २०१७ ला बार्कमधून (बीएआरसी) तंत्रज्ञान हस्तांतरणा अंतर्गत मेसर्स कार्डिया लॅब, नवी दिल्ली ने एटोम (ATOM) सुरु केले आहे.

 

·         लोकप्रिय फळ लीची अधिक दिवस ताजी रहाण्यासाठी, आईसीएआर-राष्ट्रीय लीची संशोधन केंद्र (एनआरसीएल), मुशाहरी, मुजफ्फरपुर येथे नुकतेच एक लीची प्रसंस्करण संयंत्र बसवण्यात आले आहे. या तंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून स्थानिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रेरित केले आहे. या उत्पादनाची शेल्फ लाईफ वाढल्याने निर्यातीत वाढ होईल

 

 

दीर्घकालीन संचयनासाठी लिचीवर उपचार

 

·         फ्रंटियर सायन्स सेक्टरमध्ये, डीएई ने सखोल विषयावर संशोधन करण्यासाठी यूरेनियम खाणीत एक लहान भूमिगत संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली आहे. यामुळे सर्व पिढ्यांतील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन मिळेल.

 

 

गंभीर विषयावर अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर 2017 रोजी भूमिगत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

 

·         'विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन' या विषयावरील संसदीय स्थायी समितीने 28 जुलै ते 12 ऑगस्ट 2017 दरम्यान नवी दिल्ली येथील संसदेच्या अॅनेक्स बिल्डिंगमध्ये "विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन उपक्रम" या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अणु ऊर्जा विभागाने  (डीएई) या कार्यक्रमात भाग घेतला होता.

 

·         राज्यसभा आणि लोकसभेतील सुमारे 82 खासदार, सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री (तत्कालीन) लोकसभेच्या सभापती  सुमित्रा महाजन, रेणुका चौधरी, तसेच इतर मान्यवरांनी डीएईच्या पॅव्हिलियनला भेट दिली आणि वैज्ञानिकांशी चर्चा केली.

 

·         प्रदर्शनाला भेट दिलेल्यांनी विभागाच्या यशाचे कौतुक केले आणि अनेक खासदारांनी आपल्या संबंधित भागात अन्नप्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया, आरोग्यसेवा इत्यादी विषयांवरील सुविधा उभारण्याची इच्छा व्यक्त केली.

 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

 

·         डीएईच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) आणि औद्योगिक युनिट्समध्ये एकंदर सुधारणा झाली आहे.

·         युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (यूसीआयएल) ने अनेक अडचणी असूनही दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन साध्य केले आहे.

 

 

 

टाम्लाप्ले खाण

·         अणु इंधन कॉम्प्लेक्स (एनएफसी) ने आतापर्यंत सर्वात जास्त इंधन घटक, झिरकोनीज स्पंज आणि इतर साहित्य तयार केले आहेत.

 

 

37 एलिमेंट नैसर्गिक युरेनियम ऑक्साईड इंधन बंडल

 

पीएफबीआर ईंधन सब असेम्‍बली

बीडब्ल्यूआरसाठी 36 घटक यूरेनियम समृद्ध ईंधन बंडल

 

 

·         या वर्षी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (ईसीआयएल) सर्वात मोठी ऑर्डर मिळविली  आहे, विशेषतः निवडणूक संदर्भातील उपकरणे आणि भारतीय सैन्यासाठी फ्यूज. ईसीआयएलची आतापर्यंतची सर्वाधिक उलाढाल आहे.

 

 

लेक्ट्रॉनिक फ्यूज                                  ईव्हीएम आणि वीवीएपीएटी

 

·         बोर्ड ऑफ रेडियेशन अँड आयसोटोप  तंत्रज्ञानानाने (बीआरआयटी) आजपर्यंतची विक्रमी उलाढाल केली आहे आणि देशाच्या प्रत्येक भागामध्ये रेडिओ-आयसोटोप पुरवण्यात यशस्वी झाले आहेत.

 

 

     

रेडी-टू-युज रेडिओ फार्मास्युटिकल्स

 

·         इंडियन रेअर अर्थ लिमिटेडला  (आयईआरएल) या वर्षामध्ये माफक नफा मिळाला आहे. या कालावधीत त्यांच्यासमोर विविध अडचणी असूनही उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे.

 

   

पर्यावरण अनुकूल ड्रेजिंग / उत्खनन प्रक्रिया

 

 
PIB Release/DL/2037
बीजी -म्हात्रे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau