This Site Content Administered by
विज्ञान व तंत्रज्ञान

वर्षअखेर कामगिरी, 2017 : विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग

नवी दिल्ली, 21-12-2017

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वर्ष 2017 च्या घडामोडी, कामगिरी आणि विकासात्मक प्रमुख कामांचा आढावा यात घेतला आहे.

महत्वपूर्ण घटना :

·         भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 104 व्या सत्राचे उद्‌घाटन तिरुपती इथे 3 जानेवारी 2017 रोजी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी केले.

·         भारतीय विज्ञान काँग्रेस हा देशाच्या वैज्ञानिक समुदायाकरिता महत्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे. वैज्ञानिक, संशोधक, विज्ञानाचे विद्यार्थी यांनी यात भाग घेऊन विचार विनिमय केला. चर्चेत सहभागी झाले.

·         केन्द्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 10 फेब्रुवारी 2017 रोजी इंग्रजी ब्रेल लिपितल्या "एटलस फॉर व्हिज्युअली इम्पेअरड(इंडीया)" या विशेष आवृत्तीचे प्रकाशनही केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय एटलस आणि थीम मॅपींग संघटनेने (एन ए टी एम ओ) ही ब्रेल आवृत्ती तयार केली आहे.

·         डॉ. हर्षवर्धन यांनी 10 एप्रिल, 2017 रोजी सर्वे ऑफ इंडियाच्या 250 व्या वर्धापनदिना निमित्ताने "नक्षी" पोर्टलचे उद्‌घाटन केले. सर्वे ऑफ इंडिया द्वारा तयार केलेले भूगर्भ अथवा स्थलाकृती सहित नैसर्गिक आणि मानवनिर्मित भौगोलिक वैशिष्ट्यांनीयुक्त भौगोलिक मानचित्रयुक्त ओपन सिरीज मानचित्रची (एसएसआय) स्थापना 1767 मधे झाली. त्याच्या स्थापनेनंतर निर्माण झालेले राष्ट्रीय मानचित्र धोरण - 2005 , त्या अनुरुप आहे. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत प्रमाणीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून ओपन सिरीज मानचित्र हवे असणाऱ्यांना ते नक्षी पोर्टलवर पीडीएफ स्वरुपात मिळू शकते. 1:50,000 या प्रमाणात ते डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

·         विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर 11 मे 2017 रोजी तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशापुढल्या आव्हानांवर कोणत्या उपाययोजना करायच्या? त्यावर कशी मात करायची? या दिशेने यशस्वी पाऊल टाकण्यासाठी तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. पोखरण इथे 11 मे 199८ रोजी अणुचाचणी घेण्यात आली होती. "शक्ती" अभियानानंतर आपला देश आण्विकसंपन्न राष्ट्र झाल्याची घोषणा प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. त्यानंतर आण्विक देशांच्या समुहात भारताने सहावा देश म्हणून आपले स्थान निर्माण केले.

·         कोलकाता, सॉल्ट लेक इथे 29 जून 2017 रोजी बोस इन्स्टिट्यूटच्या यूनिफाईड कँपसचे उद्‌घाटन भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की वास्तविक, प्रतिष्ठित बोस संस्थेच्या एकीकृत परिसराच्या उद्‌घाटन प्रसंगी उपस्थित राहाणे त्यांच्याकरिता विशेषाधिकारा प्रमाणेच आहे. सुमारे एका शतकापूर्वी जे. सी. बोस यांनी ही संस्था देशा समर्पित केली होती. वैज्ञानिक संशोधनाप्रती समर्पित देशाला वाहिलेली ती पहिली संस्था होती असे ते म्हणाले. या नव्या परिसराच्या उद्‌घाटनासह बोस संस्था नवीन टप्प्याची सुरुवात करत आहे. याचे महत्व अधिक आणि विशेष आहे, कारण संस्था यंदा आपले शतकमहोत्सोवी वर्ष साजरे करत आहे.

·         दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), रेल्वे मंत्री मनोज सिन्हा यांनी 22 जुलै 2017 रोजी, सर्वे ऑफ इंडियाच्या 250 व्या स्थापना दिवसानिमित्ताने एक स्मरण तिकीट जारी केले.

·         विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, डॉक्टर हर्षवर्धन यांनी 22 सप्टेंबर, 2017 रोजी, "पंडित दीनदयाळ उपाध्याय विज्ञान ग्राम संकुल परिजन"चा प्रारंभ केला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वंकष विकास साधण्यासाठी या कार्यक्रमाच्या सहाय्याने उत्तराखंड इथे काम केले जाणार आहे.

·         भारत आणि ब्रिटनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी तंत्रज्ञान तसेच नविनीकरण क्षेत्रात उभय देशांच्या संयुक्त कामगिरीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच नविनीकरणीय क्षेत्रात केलेल्या भागीदारी अंतर्गत ‘न्यूटन- भाभा’ कार्यक्रम हा अतिशय वेगाने प्रगतीपथावर मार्गस्थ केला आहे.

·         भारत आणि कॅनडा तंत्रज्ञान शिखर परिषदेचे उद्‌घाटन, 14 नोव्हेंबर, 2017 रोजी झाले. या उद्‌घाटन समारोहात उभय देशांनी आपल्या द्विपक्षीय संबंधाच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि भारतीय उद्योग महासंघाने  ( सीआयआय)  संयुक्तपणे या शिखर परिषदचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन केन्द्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री डॉक्टर हर्षवर्धन तसेच कॅनडाचे अभिनव, विज्ञान आणि अर्थ विकास मंत्री नवदीप सिंह बेंस यांनी केले.

·         मिशन इनोवेशन स्मार्ट ग्रिड्स वर्कशॉप - स्मार्ट ग्रिडला भविष्यात अक्षय उर्जेने संचालित करण्यासाठी स्मार्ट इनोवेशन ग्रिड्स मिशन काम करणार आहे. उर्जेचे आव्हान पेलण्यासाठी हा सामूहिक प्रयत्न आहे. भारत, इटली आणि चीनसह 20 सहभागी देशांच्या सह-नेतृत्वात हा महत्वाकांक्षी कार्यक्रम मिळून राबवला जात आहे. उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीने वेळोवेळी त्याचा आढावा घ्यायला हवा. संशोधन कार्याच्या प्राधान्यक्रम तसेच योजना कार्यान्वयनाची रुपरेषा तपासत राहाणेही महत्वाचे आहे. यादृष्टीने 16 ते 19 नोव्हेंबर, 2017 दरम्यान नवी दिल्लीत एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

·         कोलकाता इथे बोस इन्स्टीट्यूटच्या शताब्दी समारंभाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होऊन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी त्यास सम्मानित केले. याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, भारतीय विज्ञान क्षेत्राच्या परिदृष्यात बोस इन्स्टीट्यूटचे महत्व अनन्य साधारण आहे. देशात स्थापन झालेल्या वैज्ञानिक संस्थांमधे मुहर्तमेढ रोवण्याचा मान याच संस्थेकडे जातो. विज्ञान क्षेत्रातल्या बहुमोल सेवेचे कार्य पाहाता ही संस्था देशसेवाच करत असल्याचे स्पष्ट आहे. जैविक आणि भौतिक विज्ञान क्षेत्रात बोस इन्स्ट्यिट्यूटने संशोधनात मोलाची कामगिरी केली आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून बंगालच्या ग्रामीण भागामधे जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. इतकच नाही तर पूर्वोत्तर राज्यातल्या विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक उत्थानाचे कार्यक्रम देखील संस्था तयार करत आहे. वास्तवात पाहता, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान पोहचावे, विज्ञानाची, अभिनवतेची संस्कृती इथे रुजावी, फुलावी याकरता जमिनस्तरावर संस्था प्रयत्नशील आहे.

 

अभिनव पाऊल पुढाकारचे

·         एसईआरबी विशिष्ट प्रतिष्ठाकर्ता पुरस्कार (एसईआरबी-डीआयए) नामक नवी योजना असामान्य वैज्ञानिकांना ओळख मिळवून देणे आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी आणली जात आहे. तिला सरकारी मंजूरी मिळाली आहे. अतिरिक्त मूरल रिसर्च योजनेअंतर्गत एसईआरबी पुरस्कृत प्रकल्पांमधे अद्वितीय काम केले आहे. मात्र, एस एस भटनागर पुरस्कार/ जे सी बोस फेलोशिप यासारख्या उन्नत व्यावसायिक मान्यताप्राप्त स्तरावपर्यंत पोहचू शकले नाहीत अशा युवा वैज्ञानिकांना पुरस्कृत करणे हा या योजनेचा उद्देश्य आहे. पुरस्कार विजेत्यांना 3 वर्षांसाठी 15 हजार रुपये प्रती महिना मानधन मिळेल. त्यांना आपल्या संशोधनासाठी एका प्रकल्पाचे कामही दिले जाणार आहे.

·         तारे (टीचर एसोसिएट्स फॉर रिसर्च एक्सीलंस) मोबिलीटी स्कीम : विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पायाभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधे शोध, संशोधनाचा विकास यांच्या प्रगतीला चालना, देणे त्यांच्या शक्यता वृद्धीसाठी प्रयत्न करणे हा एसईआरबी द्वारे तयार केलेल्या नवीन योजनेचा उद्देश्य आहे. राज्य विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमधे नियमितपणे काम करणाऱ्या शिक्षकांना आयआयटी, आयआयएसटी, आयआयएसईआर, राष्ट्रीय लॅब(प्रयोगशाळा) यासारख्या शैक्षणिक संस्थांमधे अंशकालिन संशोधन करण्याची अनुमती तारे योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. हे शिक्षक ज्या शहरांमधे किंवा ठिकाणी काम करत असतील तिथल्याच जवळच्या आयआयटी, आयआयएसटी, आयआयएसईआर, राष्ट्रीय लॅब(प्रयोगशाळा) यासारख्या प्रतिष्ठित संस्थांबरोबर काम करण्याची संधी या शिक्षकांना मिळणार आहे.

·         मनक ( मिलियन माईंड्स ऑग्यूमेंटींग नॅशनल एस्पेरिशन अँड नॉलेज): सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया उपक्रमाअंतर्गत सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमधे विज्ञानाप्रती रुची निर्माण व्हावी, त्यांच्यातल्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळावा या उद्देशाने मनकचे कार्यान्वयन केले जात आहे. यामुळे नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल आणि उद्यमिंच्या संख्येतही वाढ होईल. विज्ञानाच्या दृष्टिकोणातून सामाजिक विश्लेषण विद्यार्थ्यांनी करावे. त्यांची समज वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम तयार केला आहे.

·         सायबर सुरक्षा आणि सायबर सुरक्षेच्या पायाभूत संरचनेसाठी इंटर डिस्पिलनरी सेंटर: आयआयटी कानपुरमधे,15 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सायबर सुरक्षा आणि सायबर सुरक्षेच्या पायाभूत संरचनेसाठी इंटर डिस्पिलनरी केन्द्र तयार केले आहे. याप्रकारचे हे देशातले पहिलेच केन्द्र असून तज्ञ उत्साही प्राध्यापकांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली त्याची निर्मिती झाली आहे. देशातल्या महत्वपूर्ण पायाभूत संरचनांना तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोणातून सुरक्षित करणे तसेच शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि स्टार्ट अपला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य हेतु आहे.

·         क्वांटम इन्फॉर्मेशन सायंस अँड टेक्नॉलॉजी (क्यूएसटी): नव्या पिढीच्या संगणक, दूरसंचार, तंत्रज्ञान तसेच क्रिप्टोग्राफी प्रणालीच्या विकासाकरता डीएसटीद्वारे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

·         पर्यावास उर्जा दक्षतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल : पर्यावास ऊर्जा दक्षतेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातल्या इमारतींच्या उर्जेसंदर्भातल्या घडामोडींना चालना देणे हा याचा मुख्य उद्देश्य आहे. इमारतींचे आरेखन, निर्माण आणि संचलनामधे ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न करणे, त्याकामी ज्ञान आणि अभ्यासाचा उपयोग करुन घेणे यावर लक्ष केन्द्रीत केले जात आहे. यासाठी 105 संशोधन प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी 31 प्रस्तावांची वित्त पोषणाकरता शिफारस करण्यात आली आहे.

·         उर्जा साठवणुकीसंदर्भात सामुग्री : उर्जा साठवणुकीसंदर्भात सामुग्री हा नवा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. उर्जा साठवणुकीसाठी नव्या सामुग्रींना, नव्या पर्यायांना प्रोत्साहन देणे, त्यासाठीच्या संशोधन आणि विकासावर भर देणे हा याचा उद्देश्य आहे. उर्जा उपयोगात लवचिकता आणणे, त्यासंदर्भात कैशल्यपूर्ण उपयोग आणि अक्षय ऊर्जेला चालना देऊन त्याचे मूल्य वाढवणे हा याचा प्रमुख हेतु आहे. यासंदर्भात 130 प्रस्ताव प्राप्त झाले असून, यापैकी 1८ प्रस्तावांना वित्त पोषणाकरता मंजूरी देण्यात आली आहे.

 

इज ऑफ डुइंग सायन्स :

·         एसईआरबी ऑनलाइन झाले : विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ आपल्या विविध योजनांअंतर्गत सर्व प्रस्ताव आणि प्रक्रियांबाबत 100 टक्के  ऑनलाइन झाले आहे. यामुळे हजारो वैज्ञानिकांना आता आपण पाठवलेले प्रस्ताव, अर्ज त्याबाबत घेतले गेलेले निर्णय यांची माहिती ऑनलाइन बघता येईल. आधी पत्रव्यवहारात बराच वेळ निघून जायचा. ऑनलाइन अर्ज करण्यामुळे निर्णय प्रक्रियेत गतीही येते आणि पारदर्शकताही कायम राहाते.

 

स्फुर्ती संशोधन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन :

·         इनोवेशन इन सायन्स परस्यूट फॉर इंस्पायर्ड रिसर्च(इन्सपायर) कार्यक्रमाचे पाच घटक आहेत. या अंतर्गत दरवर्षी दीड लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होते. यात अर्ज करण्यापासून शिष्यवृत्ती जमा करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. गेल्या 3-4 वर्षात सर्व कामे कागदरहीत झाली आहेत. देशभरातील विद्यार्थी या ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेत आहेत. संशोधन आणि विकासकामांना प्रोत्साहन देण्याकरता ऑनलाइन वेबआधारित एफआयएसटी योजना सुरु करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रक्रियेचे पाऊल उचलल्यामुळे अर्ज करणे आणि महाविद्यालयांना निधी जारी करणे सोपे तसेच पारदर्शक काम झाले आहे.

·         ग्रेटर एक्सेस ऑफ हाय-एंड इक्विपमेंट/ फॅसिलिटी : हाय-एंड इक्विपमेंट/ फॅसिलीटी नावाने एक वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. सर्व संस्थानं, विद्यापीठांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यंत्रणेसोबत हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे पारदर्शकता वाढणार आहे. विद्यार्थी आणि संशोधक या सुविधेचा उपयोग करु शकतील. हे पोर्टल 2017 च्या अखेरीस सुरु केले जाणार आहे.

·         इंडिया एस अँड टी पोर्टल : शालेय विद्यार्थी, वैज्ञानिक आणि समाजातल्या विविध घटकांना विभिन्न योजना, घडामोडींची माहिती देण्यासाठी महत्वाकांक्षी इंडिया एस अँड टी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. देशातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानासंबधित सर्वांना याचा लाभ होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भात इंटरनेट टिव्हीची योजना आणि कार्यान्वयन अंतिम टप्प्यात आहे. सध्या कार्यक्रम व्यवस्था उभारण्याचे काम सुरु आहे.

 

 
PIB Release/DL/2044
बीजी -शै.पा. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau