This Site Content Administered by
आरोग्‍य व कुटुंब

चित्रपटगृहे आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये तंबाखू मुक्त चित्रपट नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भातील राष्ट्रीय सल्लामसलत

 


मुंबई, 10-2-2017

देशातील नागरिकांवर चित्रपट उद्योगाचा मोठा प्रभाव जाणवतो. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियमांतर्गत चित्रपट नियमाच्या अंमलबजावणी संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक अभ्यास कार्यक्रम राबवला.

तंबाखू आणि त्याच्या दुष्परिणामांशी  मुकाबला करण्यासाठी तंबाखू विरोधी संदेश प्रभावी ठरत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील 22 टक्के कार्यक्रमांमध्ये  तंबाखूजन्य उत्पादनाचा वापर प्रदर्शित होत असून त्यापैकी 71 टक्के कार्यक्रम बालके आणि किशोरवयीन मुलांच्या पाहण्यात येतात असेही या अभ्यासात स्पष्ट झाले. 

या संदर्भात मुंबईत झालेल्या चर्चेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव सी.के.मिश्रा सहभागी झाले. तंबाखूमुळे त्याचे सेवन करण्याच्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातो हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तंबाखूचे दुष्परिणाम सांगत त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत ग्राहकांना इशारा दिला पाहिजे अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी यावेळी व्यक्त केली. तर चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवल्यानंतर तंबाखू विरोधी संदेश देणाऱ्या ध्वनीचित्रफिती प्रदर्शित केल्या जाव्यात अशी सूचना सीबीएफसीचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केली.

तंबाखूजन्‍य उत्पादने लोकप्रियतेचे निदर्शक असल्याचे भासवून तंबाखू उद्योग ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे व्हायटल स्ट्रॅटेजीच्या संचालक डॉ. नंदिता मुरुकुटीया यांनी यावेळी सांगितले.

भारतातील तंबाखूचा वापर वाढती समस्या

तंबाखू सेवनासंदर्भातील जागतिक सर्वेक्षणानुसार, 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील 35 टक्के व्यक्ती विविध माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. ग्रामीण भागातील पाच पैकी दोन तर शहरी भागातील चार पैकी एक व्यक्ती तंबाखूचे सेवन करते. भारतात निम्न आर्थिक स्तरात धूररहित पद्धतीने तंबाखूचे सेवन केले जाते. 20 कोटीपेक्षा जास्त भारतीय अशाप्रकारे तंबाखूचे सेवन करत असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. धूररहित तंबाखू उत्पादनांमध्ये गुटखा, जर्दा, पानमसाला, तंबाखूसह पान आणि खैनीचा समावेश आहे.

 
PIB Release/MH/28
बीजी -माधुरी -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau