This Site Content Administered by
अर्थ

वार्षिक आढावा 2016 : व्यय/खर्च विभाग

नवी दिल्ली, 4-1-2017

वित्त मंत्रालयाच्या व्यय/खर्च विभागाने 2016-17 या आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंग, ई-बँकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून रोकडरहित व्यवहारांना प्राधान्य दिले आणि केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या मंत्रालयांना तसेच विभागांनाही ई-पेमेंट केले. या विभागाने ‘जेनेरिक इंटरनल ऑडिट मॅन्युअल’ची दुसरी आवृत्ती विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल  ऑडिटर्स (आयआयए) इंडिया’चे सहाय्य घेण्यात येत आहे. वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने कामकाजात चालू 2016-17 या आर्थिक वर्षात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा, घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.

सार्वजनिक वित्त व्‍यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस)

संपूर्ण देशभरातील बँकिंग नेटवर्क एकमेकांशी संलग्न करून ते एकात्मिक बनवण्याचं महत्त्वपूर्ण काम पीएफएमएसमुळे यंदा पूर्ण झाले. यामुळे कोअर बँकिंग सिस्टीम (सीबीएस)चा लाभ सगळ्यांना घेता येत आहे. या प्रणालीमध्ये देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका (26), प्रादेशिक ग्रामीण बँका (54), खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँका (14), रिझर्व्ह बँक आणि इंडिया, भारतीय टपाल खाते आणि सहकारी बँका (55) समाविष्ट आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश बँकिंग सेवा या प्रणालीमार्फत व्यवहार करू शकत आहेत.

·         पीएफएमएसमध्ये आतापर्यंत (30 नोव्हेंबर 2016) अंदाजे 18 लाख एजन्सींची नोंद झाली आहे.

·         दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत ‘थेट लाभ हस्तांतर’ योजनेचा लाभ 19.07 कोटी बँक खातेदारांना झाला.

·         केंद्र सरकारने वेगवेगळृया 37 योजनांचे निधी देण्यासाठी 26.52 कोटी व्यवहार थेट लाभ हस्तांतर योजनेतून केले. या व्यवहारातून 33417.36 कोटी रुपये लाभधारकांना वितरित करण्यात आले. ही आकडेवारी 30 नोव्हेंबर 2016 पर्यंतची आहे.

·         ‘मनरेगा’चा निधी थेट बँकेच्या खात्यांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी 1 एप्रिल 2015 पासून ‘पॅन इंडिया’चा प्रारंभ झाला आहे. यानुसार 24.80 जणांच्या खात्यांवर एकूण 24571 कोटी रुपये ‘पीएफएचएस’मार्फत देण्यात आले आहेत. ही आकडेवारी 1 एप्रिल 2016 ते 30 नोव्हेंबर 2016 पर्यंतची आहे.

·         इंदिरा आवास योजनेचा निधीही जुलै 2015 पासून ‘पॅन इंडिया’मार्फत थेट बँकेच्या खात्यात केला जातो. यानुसार व्यय विभागाने ‘पीएफएमएस’च्या माध्यमातून 19.10 लाख जणांच्या खात्यावर 5114 कोटींची रक्कम जमा केली. ही आकडेवारी 1 एप्रिल 2016 ते 30 नोव्हेंबर 2016 या काळातील आहे.

·         देशातल्या 12 राज्यांमध्ये पीएफएमएस कोष एकत्रीकरण करण्यात आला आहे. उर्वरित राज्यांच्या एकत्रिकरणाचे कार्य 31 मार्च 2017 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

सेवानिवृत्तांच्या निवृत्ती वेतनाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विभागाने भविष्य पोर्टल सुरू केले.

·         सार्वजनिक तक्रार निवारणकडून आलेल्या देयकासंबंधीच्या 4475 पैकी 4508 प्रकरणे यावर्षी यशस्वीपणे निकालात काढण्यात आली.

·         स्वच्छता अभियान अंतर्गत विभागात ‘स्वच्छता पंधरवडा’ पाळण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या, उपक्रम राबवण्यात आले.

·         विमुद्रीकरणानंतर रोकडरहित व्यवहारांचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आदिंच्या प्रतिनिधींनी ई-बँकिंगविषयी माहिती दिली.

·         या विभागाने ‘ई-ऑफिस’ची अंमलबजावणी मोहिम म्हणून सुरू केली आहे.

·         वेगवेगळ्या गोष्टींची रास्त विक्री किंमत निश्चित करण्याचं कार्य विभागानं यावर्षी केलं.

·         वाटपकर्त्यांकडून किती शुलक आकारावे, याचा आढावा घेऊन त्याचे निश्चितीकरण यावर्षी करण्यात आले. यामध्ये चित्रपटाला प्रदर्शनासाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी किती शुल्क आकारावे यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

·         52 कोळसा खाणींच्या पायाभूत सुविधांसाठी नुकसान भरपाई किती द्यावी याविषयी विभागाने यावर्षी अभ्यास केला.

·         सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यामुळे त्यानुसार मागील फरकाच्या रकमेसह अंमलबजावणी करण्यात आली.

 
PIB Release/DL/26
सप्रे -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau