This Site Content Administered by
अंतराळ विभाग

पीएसएलव्ही-सी 37 द्वारे एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचे प्रक्षेपण

नवी दिल्ली, 15-2-2017

पीएसएलव्ही सी-37 या इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपक यानाच्या 39 व्या उड्डाणात 714 किलो वजनाच्या कार्टोसॅट-2 मालिकेतला उपग्रह तसेच इतर 103 उपग्रहांचे श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन आंतरराष्ट्रीय केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. पीएसएलव्हीचे हे सलग 38 वे यशस्वी प्रक्षेपण आहे. या सर्व 104 उपग्रहांचं एकत्रित वजन 1 हजार 378 किलो आहे.

पीएसएलव्ही-सी 37 सकाळी 9 वाजून 28 मिनिटं या नियोजित वेळेवर अवकाशात झेपावलं. 16 मिनिटे आणि 48 सेकंदाच्या उड्डाणानंतर सर्व उपग्रह 506 किलोमीटरवरील पूर्वनियोजित भ्रमणकक्षेत पोहोचले आणि पुढील 12 मिनिटात पूर्व उपग्रह प्रक्षेपक यानापासून पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार यशस्वीरित्या वेगळे झाले. सर्वप्रथम कार्टोसॅट-2 उपग्रह आणि त्यानंतर आयएनएस-1 आणि आयएनएस-2 वेगळे झाले. पीएसएलव्ही प्रक्षेपक यानाद्वारे आतापर्यंत अवकाशात सोडण्यात आलेल्या भारतीय उपग्रहांची संख्या 46 झाली आहे.

प्रक्षेपक यानापासून कार्टोसॅट-2 उपग्रह वेगळं झाल्यानंतर बेंगळुरूच्या इस्रोच्या आयएसपीआरएसी या उपग्रहाच्या प्रणालीवर नियंत्रण प्रस्थापित केलं असून आगामी काळात हा उपग्रह कृष्ण-धवल तसंच रंगीत छायाचित्र पाठवायला प्रारंभ करेल.

पीएसएलव्ही सी 37 उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे प्रक्षेपण करण्यात आलेल्या इस्रो नॅनो उपग्रह-1 (आयएनएस-1)चं वजन 8.4 किलोग्रॅम तर आयएनएस-2 चं वजन 9.7 किलोग्रॅम आहे.  हे दोन्ही उपग्रह भारताचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक उपग्रह आहेत.

उर्वरित 101 उपग्रहांपैकी अमेरिकेचे 96 तर नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्रायल, कझाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.

आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पीएसएलव्ही या भारताच्या उपग्रह प्रक्षेपक यानाने प्रक्षेपित केलेल्या परदेशातील ग्राहक उपग्रहांची एकूण संख्या 180 वर पोहोचली आहे.

 

 
PIB Release/DL/253
बीजी -जयश्री -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau