This Site Content Administered by
गृह

उष्मा लहरींचे दुष्परिणाम हाताळण्यासाठी एन डी एम ए ची पूर्व तयारी
उष्मा लहर कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

नवी दिल्ली, 22-2-2017

उष्मा लहर कृती आराखडा तयार करण्यासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेला आज हैदराबाद इथे सुरुवात झाली. यावर्षी उष्मा लहरींमुळे होणारे घातक परिणाम योग्यरित्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एन डी एम ए) तेलंगणा सरकारच्या सहाय्याने या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

मार्चच्या मध्यापासून सुरु होणाऱ्या उष्णतेमुळे देशातील बहुतांश भागात जिवित हानी होते, त्यामुळे योग्य वेळी आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे उष्णता प्रवण राज्यांना 2017 साठी कृती आराखडा तयार करण्यास मदत होईल. गेल्या वर्षीच्या उष्मा लहर कृती आराखड्याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे बहुतांश उष्णता प्रवण राज्यांमध्ये उष्णतेमुळे होणारी जिवित हानी 50 टक्क्यांनी कमी झाली.

या प्रसंगी एन डी एम ए चे सदस्य आर.के.जैन म्हणाले की, वर्ष 2015 मध्ये इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा उष्णतेमुळे होणाऱ्या जिवित हानीची संख्या सर्वाधिक होती. याच पार्श्वभूमीवर एन डी एम ए ने 2016 मध्ये उष्मा लहर व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली.

उष्मा लहर कृती आराखडा आणि जोखीम निवारणावरील पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये उष्मा लहर प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठीच्या उष्मा लहर कृती आराखड्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. स्थानिक पातळीवरील गरज आणि उपाययोजना शोधण्यासाठी यावेळी विस्तृत चर्चा केली जाईल.

दुसऱ्या सत्रामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, ओदिशा आणि महाराष्ट्र ही राज्ये यासंदर्भातील त्यांचे अनुभव मांडतील. जेणेकरुन इतर राज्यांना त्यांचा उष्मा लहर कृती आराखडा तयार करण्यास मदत होईल.

 
PIB Release/DL/279
सप्रे -म्हात्रे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau