This Site Content Administered by
गृह

न्यायवैद्यक क्षेत्रातील विकासामुळे न्यायिक प्रक्रियेला सहाय्य होईल – हंसराज अहिर

 


मुंबई, 23-2-2017

न्यायवैदयक हे न्यायपालिकेचा महत्वपूर्ण भाग आहे. कमी खात्री दर, प्रलंबित खटले आणि खटल्यांच्या निकालासाठी लागणारा कालावधी या तीन मुख्य समस्या सध्या न्यायपालिकेसमोर आहेत, असे गृहराज्यमंत्री  हंसराज अहिर यांनी सांगितले. आयआयटी मुंबई येथे भारतीय न्यायवैदयक  संस्थेच्या 38व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेदम्यान ते आज बोलत होते. न्यायप्रक्रिया ही प्रामुख्याने  वैदयकीय पुराव्यांवर अवलंबून असल्याने, फॉरेन्सिक मेडिकॉन  2017 मध्ये झालेल्या चर्चेचा  फायदा प्रदीर्घ  कालावधीपर्यंत न्यायपालिकेला  होईल.  यामुळे केवळ विश्वासच वाढणार नाही तर खटल्यांचा कालावधी कमी होऊन नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वासही वृध्दिंगत होईल.

भारतीय न्यायवैदयक  शास्त्र आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत पोहोचण्यासाठी या क्षेत्राला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबध्द असल्याचे तसेच ही परिषद ज्या काही शिफारशी करेल त्यावर गांभीर्याने विचार करुन त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे अहिर यांनी सांगितले.

महिलांशी निगडीत गुन्हयांबद्दल  चिंता व्यक्त करताना अहिर म्हणाले की, वैदयकीय पुराव्यांमध्ये  नुकत्याच झालेल्या प्रगतीमुळे महिलांवरील गुन्हयांची प्रकरण हाताळायला मदत झाली आहे. या परिषदेमध्ये कायदेतज्ञ, वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले आहेत जे कायदयातील सुधारणांवर विचार विनिमय करत आहेत.

भारतातील सर्व न्यायवैदयक  औषध आणि न्यायवैदयक प्रयोगशाळा या केवळ जागतिक दर्जाच्या नसाव्यात तर त्यांनी संशोधन आणि विकासामध्ये देखील योगदान दयावे अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 
PIB Release/MH/35
बीजी -म्हात्रे -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau