This Site Content Administered by
अर्थ

केंद्रीय अर्थमंत्र्यांचे काठमांडू येथील नेपाळ शिखर परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे विचार
नेपाळ मधील थेट परकीय गुंतवणुकीत भारताचा वाटा 40 %; भारत नेपाळच्या पायाभूत क्षेत्र प्रकल्प विकासासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करण्यास तयार – जेटली

नवी दिल्ली, 3-3-2017

केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काठमांडू इथे 2 आणि 3 मार्चला झालेल्या नेपाळ गुंतवणूक शिखर परिषदेत, भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करुन घेण्याबाबतचे अनुभव मांडले. भारत आणि नेपाळ यांच्यात खोलवर रुजलेले ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक बंध असल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील विस्तृत भागीदारी शक्य झाल्याचे जेटली यांनी सांगितले.

भारत आणि नेपाळ दरम्यान व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात विस्तृत सहकार्य असल्याचे जेटली यांनी नेपाळ गुंतवणूक शिखर परिषद 2017 ला संबोधित करताना सांगितले. उपयुक्त कायदेशीर आणि नियामक चौकट निर्माण करुन नेपाळ भारताकडून आणखी थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करु शकते असे ते म्हणाले. भारत नेपाळच्या व्यापार आणि गुंतवणुकीतील सर्वात मोठा भागीदार असून, नेपाळचा 2/3 व्यापार भारताबरोबर होतो आणि नेपाळमधील थेट परदेशी गुंतवणुकीत भारताचा वाटा जवळपास 40 टक्के असल्याचे जेटली यांनी सांगितले. दोन्ही देशांदरम्यान खुली सीमा असून, लाखो नेपाळी नागरीक भारतात राहतात आणि काम करतात. जलविद्युत, पारेषण वाहिन्या, रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सिंचन आदी क्षेत्रात नेपाळ भारतीय गुंतवणुकीला आकर्षित करु शकतो असेही त्यांनी सांगितले. काठमांडू-निजगढ जलद मार्ग, निजगढ इथे दुसरे विमानतळ, कोषी धरण आदी प्रकल्पात गुंतवणूक करण्याची भारताची तयारी असल्याचे जेटली म्हणाले.

जेटली यांनी नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष बिद्यादेवी भंडारी आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांची भेट घेतली. जेटली यांनी नेपाळच्या विविध मंत्र्यांसोबतही चर्चा केली. जेटली यांनी पशुपतीनाथ देवळात दर्शनही घेतले.

आपल्या द्विपक्षीय बैठकींमध्ये जेटली यांनी नेपाळच्या आर्थिक- सामाजिक विकासाचे ध्येय गाठण्यासाठी सहकार्य करण्याबाबतच्या भारताच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नेपाळचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांकरता सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी भारत तयार असल्याचेही ते म्हणाले.

 
PIB Release/DL/311
बीजी -जयश्री -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau