This Site Content Administered by
मनुष्‍यबळ विकास

डिजिटल वित्तीय साक्षरतेच्या प्रचारासाठी पळूसमधल्या एएससी महाविद्यालयाचा जावडेकर यांच्याकडून गौरव

 


मुंबई, 9-3-2017

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत (विसाका) डिजिटल वित्तीय साक्षरतेसाठी उत्तम काम केल्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या पळूस येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य (एएससी) महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय विद्यार्थी स्वयंसेवक परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माहिती- तंत्रज्ञान व दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एएससी महाविद्यालयाच्या संघाला ढाल प्रदान केली.

डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे राष्ट्राची संसाधने पारदर्शक पद्धतीने वापरता येणार असल्यामुळे पंतप्रधानांच्या संकल्पनेतल्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रचार करण्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकांनी डिजिटल वित्तीय साक्षरतेच्या प्रचारात स्वत:ला झोकून द्यावे, असं आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले. उत्तम प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

डिजिटल होणे ही काळाची गरज आहे. विकसित देशांमध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात एकूण 4 टक्के भाग चलनाचा असतो. याउलट आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनात एकूण 12 टक्के भाग चलनाचा आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

तर वित्तीय साक्षरतेचा हेतू देशाला प्रामाणिक करणे, डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे आणि डिजिटलदृष्ट्या एकसंघ करणे हा असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. तीन महिन्यात सुमारे दोन कोटी व्यक्तींना आम्ही डिजिटल व्यवहारात प्रशिक्षित केले, अशी माहिती त्यांनी दिली. 2017 मध्ये पाच कोटी व्यक्ती डिजिटल व्यवहारात प्रशिक्षित होतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

विसाका उपक्रमाची सुरुवात 12 डिसेंबर 2016 ला झाली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वयंसेवकांना खाते उघडणे, आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे, मोबाईल आधार कार्डला जोडणे याबाबत प्रशिक्षित करण्यात आले. तसेच रोखीचे व्यवहार असलेल्या समाजाचे कमी रोखीचे व्यवहार असलेल्या समाजात रुपांतर करण्यात आवश्यक असलेल्या डिजिटल साक्षरतेबाबत आवश्यक असलेली माहिती त्यांना देण्यात आली. या बदल्यात विद्यार्थ्यांना इतर 10 कुटुंबांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रचार करायचा होता आणि रोखमुक्तीसाठी त्यांना चालना द्यायची होती.

विसाका उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून डिजिटल वित्तीय साक्षरतेचे स्वयंसेवक म्हणून 4 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली.

 
PIB Release/MH/41
बीजी -सो.कु. -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau