This Site Content Administered by
गृह

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे सुरक्षाबलांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य

नवी दिल्ली, 14-3-2017

11 मार्च 2017 रोजी छत्तीसगडमध्ये सुकमा येथे सुरक्षाबलांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत निवेदन केले.

11 मार्च 2017 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या रस्ते बांधणीच्या कामी व्यस्त लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात होत्या. सकाळी सुमारे 8.53 वाजता सुरक्षाबलाचे जवान संबंधित क्षेत्रालगतच्या जंगलात पोहोचले. तेव्हा उग्रवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार तसेच आय ई डी चे स्फोट घडवून आणले. या दुर्घटनेत दुर्दैवाने 12 सुरक्षा रक्षक शहीद झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शहीद सुरक्षा रक्षकांच्या शोकमग्न कुटुंबाप्रती गृहमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली. त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे ते म्हणाले. जखमी सुरक्षा रक्षकांना सर्वोत्तम उपचार प्रदान केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुर्घटना झाली त्यादिवशी आपण छत्तीसगडमध्ये जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण केली तसेच जखमींचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. शहीद जवानांच्या कुटुंबाला केंद्र सरकारतर्फे 35 लाख रुपये, सी आर पी एफच्या जोखीम निधीतून 20 लाख रुपये, तर कल्याण कोषातून 1 लाख रुपये प्रदान केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेची संपूर्ण चौकशी करुन त्याचा सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश सी आर पी एफच्या महासंचालकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

 
PIB Release/DL/360
बीजी -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau