This Site Content Administered by
निवडणूक आयोग

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे निर्दोष असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा

नवी दिल्ली, 16-3-2017

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कार्यक्षमता आणि सुरक्षेबद्दल काही राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात आयोगाने आज एक सविस्तर प्रसिद्धपत्रक जारी केले. देशात निवडणुकांच्या काळात वापरण्यात आलेली यंत्रे निर्दोष असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय सुरक्षा मानके निश्चित केली असून, या यंत्रांमध्ये बिघाड शक्य नाही, त्यामुळे मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे कोणत्याही नेटवर्कला जोडलेली नाहीत, तसेच त्या इतर कोणत्याही नोंदींची तरतूद नाही. मतदान आणि निवडणुकीचे निकाल या काळात होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचे तपशील निवडणूक आयोगाने दिले असून, ही यंत्रे उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सज्ज आणि सीलबंद केली जातात, असे आयोगाने म्हटलं आहे.

यंत्राच्या तांत्रिक वैशिष्ट्यांबद्दलही आयोगाने माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारचे बिघाड किंवा बदल रोखण्याच्या दृष्टीने ही यंत्रे इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या सुरक्षित आहेत. या यंत्रांसाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर ओ.टी.पी./मास्कड् चिपद्वारे बर्न केले जाते, त्यामुळे त्यात बिघाड किंवा बदल करणे शक्य नसते. कोणत्याही वायर किंवा वायरलेस माध्यमातून कोणत्याही यंत्र अथवा यंत्रणेला ही यंत्रे जोडता येत नाहीत. त्यामुळे त्यातील माहितीमध्ये फेरफार होण्याची शक्यता नसते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये वापरलेले सॉफ्टवेअर संरक्षण मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम बी.ई.एल.च्या निवडक अभियंत्यांनी आणि अणु ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम ई.सी.आय.एल.ने तयार केले असून, हे दोन्ही उपक्रम स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. हे सॉफ्टवेअर पूर्ण झाल्यानंतर सॉफ्टवेअर आवश्यकता वैशिष्ट्यांनुसार त्याची रचना, परीक्षण आणि मूल्यांकन स्वतंत्रपणे केली जाते.

या सॉफ्टवेअरचा गैरवापर किंवा त्यात बदल करण्याची कोणतीही शक्यता नसून, त्यासाठी ते आवश्यक सुरक्षा मानके आणि प्रशासकीय यंत्रणांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहेत.

2000 सालापासून राज्य विधिमंडळांच्या 107 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तसेच 2004, 2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला आहे.

1979 साली सुरु झालेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक सल्लामसलतींपासून दीर्घ राजकीय चर्चांनंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरात आणली गेली. निवडणूक प्रक्रिया जलद करण्याबरोबरच बोगस मतदान आणि मतदान केंद्रे बळकावण्यासारख्या प्रकारांना आळा घालणे हा सुद्धा त्यामागचा उद्देश होता. निवडणूक आयोगाचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक  www.eci.nic.in येथे पाहाता येईल.

 
PIB Release/DL/395
बीजी -माधुरी -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau