This Site Content Administered by
जलसंपदा

केंद्र सरकार नद्यांच्या गाळ व्यवस्थापना संदर्भातील  धोरण विकसित करणार

नवी दिल्ली, 17-3-2017

केंद्र सरकार लवकरच नद्यांच्या गाळ व्यवस्थापनासंदर्भातील धोरण विकसित करणार आहे. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली.  भारतीय नद्यांच्या गाळ व्यवस्थापनासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेचे आज त्यांच्‍या हस्ते उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या नद्यांमध्ये गाळाच्या समस्येसंदर्भात अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यांनी अनेक उपाययोजनांही सुचवल्या. आजच्या परिषदेच्या माध्यमातून या समित्यांच्या शिफारशींना  अनुसरुन सल्लामसलत होईल आणि अंमलबजावणीच्या दिशेने पुढची पावले टाकली जातील, असा विश्वास नरेंद्र कुमार यांनी व्यक्त केला. नद्यांच्या गाळ व्यवस्थापनासाठी पर्यावरण स्नेही आणि  तांत्रिक तसेच आर्थिक दृष्टया  सक्षम  उपाय योजना आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले.

गेल्या काही वर्षात  नद्यांच्या गाळाच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे.  पूर प्रवर्ण नद्यांची वहन क्षमता बदलली असून त्यामुळे पूर स्तरात वाढ होत असल्याचे हल्ली मानले जाते. आज घडीला गाळ व्यवस्थापना संदर्भातील माहिती मर्यादित स्वरुपात उपलब्ध आहे. या कामासाठी अधिक ज्ञान व्यवस्थापन आणि कौशल्याचा वापर आवश्यक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

नद्यांच्या गाळ व्यवस्थापनाच्या समस्येने गेल्या काही काळात सर्वसामान्य जनतेचेही लक्ष वेधून घेतले आहे.  पूरस्थिती, पर्यावरण, नद्याचे आरोग्य लक्षात घेत नद्यांचे गाळ व्यवस्थापन आणि त्या संदर्भातील धोरण तयार करणे आवश्यक झाले आहे.

 
PIB Release/DL/397
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau