This Site Content Administered by
शहर विकास

मुंबईत आयोजित “इंडिया टूडे परिषद 2017मध्ये” नवीन शहरी पुनर्निर्माण आवश्यक - केंद्रीय शहर विकास  मंत्री  

 


मुंबई, 17-3-2017

नवीन शहरी पुनर्निर्माण उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतातील शहरांच्या नागरी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

ते आज मुंबईत इंडिया टुडे परिषदेला संबोधित करत होते. नवीन संज्ञा प्रचलित करण्यासाठी प्रसिध्द असलेले नायडू यांनी आज CITY चा अर्थ ‘Civic Infrastructure To You असा आपल्याला अभिप्रेत असल्याचे सांगितले. केंद्र सरकारची स्मार्ट शहरे मोहिम म्हणजे शहरे आणि नगरांना आर्थिक घडामोडींचे शाश्वत केंद्र म्हणून परिवर्तित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि  त्यामुळे नागरिकांना सर्वच बाबतीत सुधारित जीवनमान प्राप्त होणार आहे, असे ते म्हणाले. भारतीय शहरातील जीवनमान निर्देशांकात सुधारणा करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

स्मार्ट शहर मोहिमेंतर्गंत परवडण्याजोग्या घरांची निर्मिती, दर्जेदार पाण्याच्या उपलब्धतेची खात्री, सामाजिक पायाभूत सुविधा, चालणे तसेच सायकल चालवण्याला प्रोत्साहन, स्वच्छता, रोजगार निर्मितीला चालना  अशा लाभांसह विकास अपेक्षित असून त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. 2022 सालापर्यंत सर्वांसाठी घर ही कल्पना सत्यात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरांमधील स्पर्धेमुळे उत्साहित  करणारे निकाल समोर येत आहेत. सर्वोत्तम कल्पना प्राप्त  होण्याच्या दृष्टीने  शहरांमध्ये स्पर्धा घडवून आणण्याची कल्पना आम्ही राबविली. याच विचारातून स्मार्ट शहरे स्पर्धेची संकल्पना प्रत्यक्षात आली  आणि त्यामुळे आमच्या शहरांमध्ये मोठा बदल दिसून येत आहे असे नायडू यांनी सांगितले.

स्मार्ट शहर संकल्पना ही केवळ  स्वप्नवत नाही खालावणाऱ्या शहरी पर्यावरणात चकचकीत शहरी बेटे निर्माण करणे असेही या संकल्पनेचे स्वरुप नाही.   स्मार्ट शहर म्हणजे चतुरपणे विचार करणारे, चतुर दृष्टिकोन असणारे आणि त्याची चातुर्याने अंमलबजावणी करणारे  उत्तम शहर होय.  100 स्मार्ट शहरे पुरेशी नाहीत, मात्र इतर शहरांना स्मार्ट होण्याच्या दृष्टीने ती प्रेरक ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उपक्रम आणि योजनांमध्ये सार्वजनिक सहभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्वाचा वाटतो. नवी दिल्ली किंवा राज्यांच्या राजधान्यांमध्ये योजना आखण्यापेक्षा त्यात सार्वजनिक सहभागाची आवश्यकता त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. सरकारची योजना नागरिक प्रभावीपणे कशी अंमलात आणतात याचे स्वच्छ भारत हे उत्तम उदाहरण असल्याचे नायडू यांनी सांगितले.

केंद्रीय संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमांबद्दल माहिती दिली. भारत औद्योगिक क्रांतीला मुकला असला तरी युध्दानंतरच्या तंत्रज्ञान संबंधी विकासामुळे डिजिटल क्रांती मात्र भारतात वेगाने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या सक्षमीकरणाबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वक्तव्य केले. लवकरच नवे शिक्षण धोरण घोषित होणार असून त्यात शिक्षण हे विद्यार्थी स्नेही करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सबको शिक्षा, अच्छी शिक्षा या वचनानुसार नवे शिक्षण धोरण मार्गदर्शन करेल, असेही ते म्हणाले.

इंडिया टूडेची परिषद ही नवीन योजना, नाविन्यपूर्ण अनुभव  तसेच चर्चेच्या माध्यमातून विचार प्रक्रियेला चालना देणारे वार्षिक व्यासपीठ असून या परिषदेत राजकीय नेते,  धोरण निर्माते उद्योगातील अग्रणी विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय विचारवंत सहभागी होतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून शनिवारी सेटींग इंडियाज्‌ न्यू अजेंडा या विषयावर विशेष भाषण करणार आहे.

(17 मार्च रोजी इंडिया टूडे परिषदेतील राष्ट्रपतींच्या संबोधना संदर्भात स्वतंत्र प्रसिध्दी पत्रक जारी केले जाईल.)

 
PIB Release/MH/43
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau