This Site Content Administered by
पंतप्रधान

योगादा सत्संग मठाच्या शताब्दी स्मृत्यर्थ विशेष टपाल तिकीटाच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्ली, 7-3-2017

योगी परिवाराच्या सर्व महानुभावांनो, आज 7 मार्च आहे. बरोबर 65 वर्षांपूर्वी एक शरीर आमच्याजवळ राहिले आणि एका मर्यादित कक्षेत बंदिस्त झालेला आत्मा युगानुयुगांची श्रध्दा बनून विस्तारला.

आज आपण 7 मार्चला एका विशेष प्रसंगी एकत्र आलो आहोत. मी श्री श्री माताजींना नमस्कार करतो कारण मला सांगण्यात आले आहे की, लॉसएंजिसमध्ये या कार्यक्रमात त्याही सहभागी झाल्या आहेत.

जसे की स्वामीजी सांगत होते की, जगातील 95 टक्के लोक आपल्या मातृभाषेत योगीजींचे आत्मचरित्र वाचू शकता, पण यापेक्षा माझे या गोष्टीकडे अधिक लक्ष जाते की, जगातील एक माणूस ज्याला या देशाची काहीही माहिती नाही, येथील भाषेची माहिती नाही, त्याला तर फक्त हा एक वेष वाटतो, काय कारण असेल की तो ही ते वाचण्याकडे आकर्षित होत असेल ? काय कारण आहे की, प्रत्येक जण विचार करतो की मीच थोडासा प्रसाद वाटेन,  आम्ही मंदिरात जातो तेव्हा जो काही थोडासा प्रसाद मिळतो तो घरी येऊन अगदी अल्प प्रमाणात का होईना पण जितके लोक  असतील त्यांना वाटतो. हा प्रसाद माझा नाही आणि मी तो तयारही केलेला नाही. पण  ही काही तरी पवित्र गोष्ट आहे मी वाटल्यास मला आनंद मिळतो.

योगीजींनी जे कार्य  केले आहे ते आम्ही प्रसादाच्या रुपात आम्ही वाटत आलो आहोत तर आतील अध्यात्मिक  सुखाची जाणीव होत आहे. त्याचवेळेला आपल्याकडे मुक्तीचा मार्ग वगैरेवर भरपूर चर्चा होत असते, एक असाही वर्ग आहे ज्यांची विचारधारा अशी आहे की याच आयुष्यात जे आहे ते आहे, उद्याचे कुणी पाहिलेय. काही असे लोक आहेत की जे मुक्तीचा मार्ग आणखी विस्तारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु योगींचा पूर्ण प्रवास आपण पाहतो तर तर तेथे मुक्तीच्या मार्गाची नव्हे  तर अंतर्यात्रेची चर्चा होत आहे. आपण स्वत: किती  अंर्तमुख  होऊ शकतो, स्वमध्ये किती एकरुप,  समाविष्ट होऊ शकतो. त्रुटीगत विस्‍तार हा एक स्वभाव असून अध्यात्म हा आपल्या स्वमध्ये जाण्याचा एक अमर्याद अनंत मंगलमय प्रवास आहे आणि हा प्रवास योग्य मार्गावर आणि योग्य वेगाने योग्य अंतिम स्थानी पोहचवण्यात आमचे ऋषी, मुनी, आचार्य, भगवती, तपस्वी यांनी अतिशय मोठे योगदान दिले आहे आणि वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ही परंपरा पुढे जात आली आहे.

योगीजींच्या आयुष्याचे वैशिष्टय, त्यांचे आयुष्य तर खूप कमी होते कदाचित हा ही एक अध्यात्मिक संकेत असेल. कधी कधी हठयोग्यांना वाईट ठरवले जाते, पंरतु ते हठयोगाच्या सकारात्मक पैलूंबाबत वेगवेगळे तर्क देऊन अत्यंत आक्रमकपणे त्याची व्याख्या निश्चित करत असत. परंतु प्रत्येकाला क्रिया योगाकडे जाण्यासाठी प्रेरित करत असत. योगाचे जितके प्रकार आहेत त्यात क्रिया योगने आपले स्थान निश्चित केले आहे, असे मी आता मानतो, ज्यामुळे आम्हाला आपल्या आत घेऊन जाण्यासाठी आत्मबलाची गरज असते. काही योग असे आहेत की, ज्यात शारिरीक बळाची गरज असते. क्रिया योग असा आहे की जिथे आत्मबलाची गरज असते. खूप कमी लोक आयुष्याचे उद्दिष्ट ठरवितात. योगीजी म्हणत असत की, रुग्णालयातील रुग्णाच्या बिछान्यावर मरावे अशी माझी इच्छा नाही. मी तर बूट घालून महाभारतीचे स्मरण करत त्या रुपात अंतिम निरोप घेईन, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जे भारत सोडून नमस्ते  करुन पाश्चात्य जगाला संदेश देण्याचे स्वप्न घेऊन निघाले. परंतु, एक सेंकदही असा गेला नसेल ज्यात ते भारतमातेपासून वेगळे झालेले असतील. 

मी काल काशीत होतो, वाराणसीहून रात्रीच आलो आणि योगीजींच्या चरित्रात बुडून गेलो. वाराणसीत योगीजींचे बालपणातील भरपूर गोष्टी आहेत.  शरीराने जन्म तर गोरखपूरमध्ये घेतला. परंतु बालपण वाराणसीत गेले. गंगा आणि तेथील साऱ्या परंपरा, त्‍या अध्यातिमक शहरांचा  त्यांच्या मनावर जो परिणाम झाला होता ज्यांनी एक प्रकारे त्यांचे बालपण सजवले आणि घडवले, त्याही दिवशी ते आपल्या कर्तव्य पदावर कार्यरत होते. अमेरिकेतील भारताचे जे राजदूत होते त्यांच्या सन्‍मानार्थ कार्यक्रम सुरु होता आणि भारताच्या गौरव समारंभात ते व्याख्यान देत  होते. त्याचवेळेला कपडे बदलायला वेळ लागणार नाही,  इतक्या थोडया वेळात ते निघून गेले.  जाता जाता त्यांचे जे अखेरचे शब्द होते मला वाटते तीच खरी देशभक्ती. मानवता आध्यात्मिक आयुष्याच्या प्रवासाला कुठे घेऊन जाते, हे त्याचे अखेरचे अद्‌भूत शब्द होते ते ही एका राजदूताच्या कार्यक्रमात, जो सरकारी  कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात योगीजी म्हणत आहेत की, जेथे गंगा, गुहा, जंगल, हिमालय आणि मानवी ईश्वरप्राप्तीचे  स्वप्न पाहतो. म्हणजे पहा केवढी विसतारित कल्पना आहे. गुहा देखील ईश्वराचे स्वप्न पाहतात, जंगलही ईश्वराचे स्वप्न पाहते, गंगाही ईश्वराचे स्वप्न पाहते, फक्त मानवच नाही.

माझ्या शरीराने त्या मातृभूमीला स्पर्श केला  याची मला धन्यता आहे. ज्या शरीरात ते विराजमान झाले होते त्या शरीरातून हे अखेरचे शब्द निघाले होते. मग तो आत्मा अंतिम प्रवासाला निघून गेला. मला असे वाटते की एकात्मभाव : आदी शंकराचार्य यांनी अद्वैत  सिध्दांताची चर्चा केली आहे, असे मानत नाही. तो असे मानतो की ईश्वर माझ्यात आहे आणि मी ईश्वरात आहे, तोच अद्वैत  आहे. आणि योगीजींनी एका कवितेतून हे अत्यंत सुंदर रितीने स्पष्ट केले आहे, तसे तर यात ती दिलेली नाही, परंतु जेव्हा मी त्या कवितेचा अर्थ लावतो आणि वाचतो तेव्हा अद्वैत सिध्दांताच्या ती अगदी जवळ  आहे अशी माझी खात्री होते.

त्यात योगीजी म्हणतात ब्रम्ह माझ्यात सामावले गेले आणि मी ब्रम्हात समावलो गेलो. हे अद्वैत सिध्दांताचेच एक सरळ स्वरुप आहे. ब्रम्ह माझ्यात सामावले गेले, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञै सर्वच्या सर्व एक झाले. जसे आपण म्हणतो ना की कर्ता आणि कर्म एक झाले की कार्यसिध्दी सहज होते. कर्त्याला क्रिया करावी लागत नाही आणि कर्म कर्त्याची प्रतिक्षा करत नाही. कर्ता आणि कर्म जेव्हा एकरुप होतात तेव्हा सिध्दीची एक विलक्षण अवस्था होते.

त्याच प्रकारे योगीजी पुढे म्हणतात की, शांत, अखंड, रोमांच, नित्य नूतन शांती सदासर्वकाळ हवी आहे. म्हणजे कालची शांती आज कदाचित कामाला  येणार नाही. मला आज नित्य नूतनी नवीन शांती हवी आहे आणि म्हणूनच स्वामीजींनी आपले शेवटचे शब्द उच्चारले होते ओम शांती शांती हे शब्द येतात. सर्व आशा आणि कल्पनांपेक्षाही वेगळा असा आनंद देणाऱ्या समाधीचा सर्वोच्च आनंद. त्या अवस्थेचे वर्णन योगीजींनी आपल्या एका समाधी कवितेत अत्यंत चपखल प्रकारे आपल्यासमोर सादर केले आहे आणि मला वाटते की योगीजींनी इतक्या सहजतेने स्वत:चे  जीवन त्याप्रकारे जुळवून घेतले. पूर्ण योगीजींचे आयुष्य या दृष्टीने पाहिले पाहिजे, आपण  हवेशिवाय राहू शकत नाही. हवा प्रत्येक क्षणी असते. आपण हात हलवतो तेव्हा हवा असे काही म्हणत नाही, जरा थांबा, मला इथे वाहू द्या. योगीजींनी अगदी त्याच प्रकारे आपले स्थान आपल्या अवतीभवती समाविष्ट करुन टाकले आहे की आम्‍हाला जाणीव होत असते. परंतु अडथळा कधीच येत नाही, असा विचार करतो की ठीक आहे, आज हे काम करु शकत नाही उद्या करुन टाकू. ही प्रतिक्ष करण्याची क्षमता, हे धैर्य फारच कमी व्यवस्था आणि परंपरांमध्ये पहायला मिळते. योगीजींनी संस्थेला इतकी लवचिकता  प्रदान केली आहे की आज शताब्दी पूर्ण झाली, स्वत: तर या संस्थेला जन्म देऊन निघून गेले. परंतु ही एक चळवळ बनून गेली, अध्यात्मिक जाणीवेची निरंतर अवस्था बनली आणि कदाचित आता चौथी पिढी तीत सक्रीय असेल. याआधी तीन-चार पिढया गेल्या.

परंतु न भ्रम निर्माण झाला न लक्ष्यांतर झाले. संस्थेबद्दल मोह असेल, जर व्यवस्थाकेंद्री प्रक्रिया असेल तर व्यक्तीचे विचार प्रभाव वेळ याचा प्रभाव संस्थेवर असतो. परंतु जी चळवळ कालातीत असते, काळया मर्यादांमध्ये बंदिसत नसते, वेगवेगळया पिढया आल्या तरी न कधी व्यवस्थांमध्ये  संघर्ष होतो न दुरावा येतो, हलक्याफुलक्या स्वरुपात आपले पवित्र कार्य त्या करत राहतात.

योगीजींचे एक मोठे योगदान असे आहे की, अशी व्यवस्था ते करुन गेले की ज्या व्यवस्थेत बंधन कसलेच नाही. जसे कुटुंबाला काही घटना नसते, तरीही कुटुंब चालत असते. योगीजींनी संस्थेची व्यवस्था अशी बनवली की ज्यात सहजतेने प्रक्रिया सुरु राहतील. ते बाहेर गेल्यावरही ती चालत राहिली आहे आणि आज त्यांचा आत्मिक आनंद घेत असतानाच आम्हीही ती चालवत आहोत. मला असे वाटते की हे खूप मोठे योगदान आहे. जग आज अर्थकारणाने प्रभावित आहे, तंत्रज्ञानाने प्रभावित आहे आणि त्यामुळे जगात ज्याला ज्या प्रकारचे ज्ञान आहे, त्याच तराजूत तो जगाला तोलून पाहतो. माझ्या समजशक्तीनुसार मी आपल्याबद्दल अंदाज बांधतो. जर माझी समज वेगळी असेल, तर मी काही वेगळा अंदाज करेन, विचार करण्याची क्षमता, स्वभाव आणि त्याच्या पर्यावरणाचा परिणाम त्यावर असतो. याचमुळे जगात भारताची तुलना केली जात असेल, तर ती लोकसंख्येच्या संदर्भात केली जात असेल, जीडीपीच्या संदर्भात केली जात असेल, रोजगारी-बेरोजगारीच्या संदर्भात होत असेल. जगाचे हे तेच तराजू आहे. परंतु जगाने ज्या तराजूने भारताला ओळखले नाही, भारताच्या ओळखीचा आणखी एक मापदंड आहे, एक तराजू आहे आणि तीच भारताची शक्ती आहे, ती आहे भारताचे अध्यात्म. देशाचे दुर्दैव हे आहे की काही लोक अध्यात्मालाच धर्म मानतात. धर्म, संप्रदाय यापेक्षा अध्यात्म खूप वेगळे आहे. आमचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की, भारताचे अध्यात्मिकरण हेच त्याचे सामर्थ्य आहे आणि ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहिली पाहिजे. या अध्यात्माला जागतिक अवकाशावर पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या ऋषीमुनींनी केला आहे. माझ्या मते योग एक सरळ प्रवेशाचा मार्ग आहे. जगातील लोकांना तुम्ही आत्मवत सर्वभूतेषु समजावायला जाल, तर कुठे ताळमेळ बसणार नाही. एकीकडे जेथे खा, प्या आणि मजा करा याचीच चर्चा होत असते तेथे त्येन तक्तेन भुन्जित: असे म्हटले तर कुणाच्या गळी उतरणार नाही.

पण मी जर त्यांना सांगितले की, तुम्ही नाक हातात धरुन थोडा वेळ असे बसा, तुम्हाला आराम वाटेल तर त्याला वाटते की चला सुरु करु या. त्यामुळे योग हाच आमच्या अध्यात्मिक प्रवासाचा पहिला प्रवेश मार्ग आहे. ज्याला अंत कुणी समजू नये, परंतु दुर्दैव हे आहे की धनाची स्वत:ची एक ताकद असते, धनवृत्तीही असते. त्यामुळे त्याचेही व्यापारीकरण होत आहे की इतक्या डॉलरमध्ये इतकी समाधी प्राप्त होईल..... काही लोकांनी योगालाच अंतिम मानले आहे.

योग अंतिम स्थान नाही. अंतिम स्थानावर जाण्यासाठी पहिले प्रवेशद्वार आहे. डोंगरावर गाडी चढवायची असेल, तर सुरुवातीला धक्के मारावे लागतात. गाडी बंद पडते परंतु एकदा ती सुरु झाली की वेग घेते. योगही असाच एक प्रवेशद्वार आहे एकदा प्रथम त्याला पकडून पुढे गेलो की तो चालवत राहतो. मग जास्ती प्रयत्न करावे लागत नाहीत. ती प्रक्रियाच आपल्याला पुढे घेऊन जाते जो क्रिया योग आहे.

आमच्या देशात पुन्हा काशीची आठवण येणे स्वाभाविक आहे. कशा सहजतेने आमच्या संतांनी प्रत्येक गोष्टीला सहजतेने प्रस्तुत केले आहे. संत कबीरदास यांनी एक मजेदार गोष्ट सांगितली आहे, जी माझ्या मते योगीजींच्या जीवनाला पूर्ण लागू होते. त्यांनी म्हटले आहे की अवधूता युगन युगन हम योगी..... आवै ना जाये, मिटे ना कबहू, सबद अनाहत भोगी, कबीरदास म्हणतात की योगी तर युगानुयुगे राहतो. तो येत नाही की जात नाही. तो मरतही नाही. मला वाटते की आज आपण योगीजींच्या त्या आत्मिक स्वरुपाच्या साथीने एक सहप्रवासाची अनुभूती घेत आहोत. तेव्हा संत कबीरदास यांचे वचन तितकेच खरे आहे की योगी येत नाहीत आणि योगी जात नाहीत, ते तर आमच्याबरोबर असतात.

त्या योगीजींना वंदन करुन आपल्या सानिध्यात या पवित्र वातावरणात काही क्षण घालवण्याचे भाग्य मला लाभले, मला खूप छान वाटले. पुन्हा एकदा योगीजींच्या त्या महान परंपरेला प्रणाम करुन सर्व संतांना प्रणाम करत आणि अध्यात्मिक प्रवास पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक नागरीकाप्रती आदर व्यक्त करुन माझे भाषण संपवतो. धन्यवाद.

 
PIB Release/DL/407
बीजी -- -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau