This Site Content Administered by
आरोग्‍य व कुटुंब

सार्वजनिक आरोग्य सेवांवर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 1.4 टक्के खर्च – आर्थिक सर्वेक्षण 2016-17

नवी दिल्ली, 21-3-2017

आर्थिक सर्वेक्षण 2016-17 नुसार सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवांवर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 1.4 टक्के खर्च केला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या खर्चाचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 2015ची आकडेवारी जाहीर केली असून, त्यानुसार भारताने सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 1.16 टक्के खर्च 2012 मध्ये केला असल्याचे नमूद केले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2016चा राष्ट्रीय आरोग्य तक्ता प्रसिद्ध केला असून, त्यानुसार भारतात किती लोकांच्या मागे एक डॉक्टर कार्यरत आहे, हे स्पष्ट होते. यासंबंधीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 

अनुक्रम

राष्ट्रीय परिषदेकडे नोंद असलेल्या डॉक्टरची संख्या

किती लोकसंख्येमागे एक डॉक्टर / दंत चिकित्सक आहे

1

ॲलोपॅथिक डॉक्टर्स

1305.95

2

आयुष डॉक्टर्स

1684.23

3

दंतवैद्य शल्य चिकित्सक

8018.48

 

 

डॉक्टरांची उपलब्धता वाढावी आणि वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ही दरी कमी करावी, यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.

· वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी जमीन, शिक्षकवर्ग, कर्मचारी मिळावेत, यासाठी नियम शिथील करण्यात आले आहेत.

· ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाची मर्यादा वाढवून 150 वरुन 250 करण्यात आली आहे.

· ‘एमबीबीएस’च्या जागा वाढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवण्यात येत आहे.

· वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक यांची सेवा वयोमर्यादा 65 वरुन 70 करण्यात आली आहे.

देशभरात वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली. याची महिती या खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिली.

 
PIB Release/DL/417
बीजी -सुवर्णा -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau