This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

देशात चित्रपट, करमणूक उद्योगाला पोषक वातावरण तयार करणार - अजय मित्तल

 


मुंबई, 21-3-2017

 

 

 

देशात चित्रपट आणि करमणूक व्यवसायाच्या वृद्धीसाठी सौहार्दाचे पूरक वातावरण तयार करण्यासाठी त्यांची मंत्रालय प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अजय मित्तल यांनी आज मुंबई येथे बोलतांना केला.

‘फिक्की’च्या वतीने प्रसार माध्यमे आणि करमणूक उद्योग व्यावसायिकांच्या परिषदेत आज मित्तल बोलत होते. चित्रपट आणि करमणूक उद्योग क्षेत्रात 1.2 लाख कोटींची गुंतवणूक केली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असलेल्या आणि सातत्याने वाढत चाललेल्या उद्योगाला आवश्यक त्या पुरक सोयी-सुविधा देण्यावर सरकार प्राधान्य देणार आहे, असेही मित्तल यांनी यावेळी सांगितले.

चित्रपट व्यवसाय सुलभतेने करणे शक्य व्हावे, यासाठीही सरकारने उपाययोजना केल्या आहेत. प्रसार माध्यम क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असून, गेल्या दोन वर्षात सरकारने दूरचित्रवाणीच्या 177 नवीन वाहिन्यांना प्रक्षेपणाची परवानगी दिली आहे. तसेच 103 शहरांमध्ये 164 नवीन एफ.एम.वाहिन्यांचे कार्यक्रम आता प्रसारीत होऊ शकणार आहेत.

भारतात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यासाठी ‘एफ एम ओ’ म्हणजे फिल्म फॅसिलिटी ऑफिस ही एक खिडकी योजना सुरु केली आहे. गेल्या वर्षभर ‘एफ एम ओ’ने या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सेवा पुरवली. याशिवाय गृह मंत्रालयाने ‘फिल्म व्हिसा कॅटेगिरी’ला मान्यता दिली आहे. चित्रीकरणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि सुविधा पुरवणाऱ्या राज्यांना एक कोटी रुपयांचा पुरस्कारही सरकारने जाहीर केला आहे, अशी माहिती मित्तल यांनी यावेळी दिली. सेन्सॉरशिपविषयी श्याम बेनेगल समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास सरकार करत असून, त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे मित्तल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी स्टार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फिक्कीचे करमणूक समितीचे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘सेन्सॉरशिप’च्या नावाखाली निर्मिती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा मुद्दा मांडला. ज्येष्ठ चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनीही उदय शंकर यांची री ओढून एकूणच ‘सेन्सॉरशिप’ रद्द करावी, त्याऐवजी वयोगटानुसार चित्रपटांना प्रमाणपत्र द्यावे, असे मत व्यक्त केले.

‘फिक्की’च्या या परिषदेला करमणूक उद्योगातील देश-विदेशातील प्रतिनिधी उपस्थित होते. कॅनडाचे 100 जणांचे प्रतिनिधी मंडळ यावेळी उपस्थित होते. भारतातल्या चित्रपट व्यवसायात भागीदारीसाठी चाचणी करण्याच्या हेतूने हे पथक सहभागी झाले होते.

 
PIB Release/MH/47
बीजी -सुवर्णा -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau