This Site Content Administered by
ऊर्जा

सर्वांना 2019 पर्यंत 24X7 परवडणारी आणि पर्यावरण स्नेही वीज पुरवणार

नवी दिल्ली, 23-3-2017

देशात सर्वांना सप्ताहभर अगदी चोवीस तास परवडणारी आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा पुरवण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सरकारने दिलेली माहिती आणि आखलेल्या योजना पुढीलप्रमाणे आहेत.

·         ज्या खेड्यांमध्ये वीज नाही अशा 18,452 गावांचे (1 एप्रिल 2015च्या आकडेवारीनुसार) विद्युतीकरण करणे. 20 मार्च 2017 पर्यंत 12,661 गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले.

·         सप्ताहातले सर्व दिवस चोवीस तास वीज पुरवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणे. त्याप्रमाणे वीज निर्मिती, वितरण प्रणाली तयार करणे.

·         ग्रामीण भागांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना लागू करण्यात आली. (अ) कृषी आणि अ-कृषी अशा दोन स्वतंत्र जोडण्या करुन वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या.

·         शहरी विभागासाठी एकीकृत ऊर्जा विकास योजना सुरु करण्यात आली.

·         विद्युत वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला.

·         ‘उदय’ योजना लागू करण्यात आली.

·         कोळशावर आधारीत ऊर्जा प्रकल्पांचा खर्च अशा पद्धतीने कमी होऊ शकतो, याचा विचार प्राधान्याने करण्यात आला. यामध्ये देशातला कोळसा वापरण्यावर भर देण्यात आला.

·         2014-17 (28.2.2017 पर्यंत) या काळात ऊर्जा निर्मितीमध्ये 56,232.6 मेगावॅटची वाढ नोंदवली गेली.

·         सन 2013-14 मध्ये वीजनिर्मितीमध्ये 967 अब्ज युनिटवरुन 1048 अब्ज युनिटपर्यंत वृद्धी झाली. चालू वर्षात 2016-17 मध्ये फेब्रुवारी 2017 पर्यंत 1057.746 अब्ज युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे.

·         विद्युत उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ नोंदवण्यात आली.

·         नवीनीकरण ऊर्जेसाठी हरित ऊर्जा पट्टा तयार करण्यात आला.

·         ‘उन्नत ज्योती’ अंतर्गत सर्वांना वीज देण्यासाठी अतिशय परवडणाऱ्या किंमतीत ‘एलईडी’ बल्बचा पुरवठा करण्यात आला. या योजनेतून 77 कोटी बल्ब बदलण्यात आले. आतापर्यंत देशभरात 21.8 कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले. त्या व्यतिरिक्त 5.36 लाखांपेक्षा जास्त ऊर्जा बचत करणारे पंखे आणि 13.37 लाख एलईडी ट्यूब वाटण्यात आले.

·         राष्ट्रीय पथदिवे कार्यक्रमांतर्गत 1.4 कोटी एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत. यामुळे 9 अब्ज केडब्ल्यूएच वीजेची मार्च 19 पर्यंत बचत होणार आहे. आत्तापर्यंत देशभरातल्या रस्त्यांवरचे 18.3 लाख दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

अशी माहिती ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज सभागृहात दिली.

 
PIB Release/DL/452
बीजी -सुवर्णा -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau