This Site Content Administered by
पंतप्रधान

देशाच्या परिवर्तनाचा घटक बनावे- पंतप्रधानांचे “मन की बात” द्वारे नागरिकांना आवाहन

 


मुंबई, 26-3-2017

नुतन भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी देशाच्या परिवर्तनाचा एक हिस्सा बननण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आकाशवाणीवरुन मन की बात च्या 30व्या आवृत्तीत आपले विचार मांडताना पंतप्रधानांनी सांगितले की, 125 कोटी भारतीयांच्या परिवर्तना प्रतीच्या आकांक्षा नवीन भारताचा पाया ठरतील.

नुतन भारत हा कुठलाही सरकारी कार्यक्रम नाही तसंच हा कुठलाही प्रकल्प अथवा कुठल्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामाही नाही. नवीन भारत हे 125 कोटी भारतवासियांसाठी जागरुक होण्याचे आवाहन असून दैदिप्यमान भारत घडविण्याकरता एकत्रित येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या भारतीयांच्या भावनांचे सार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या स्वत:च्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त शोषित, वंचित, आणि गरीबांसाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या लाखो व्यक्ती आहेत. मानवतेची सेवा हीच देवाची सेवा ही भावना भारतीयांच्यात नैसर्गिकरित्याचं आहे असे पंतप्रधान म्हणाले.

जर प्रत्येक प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार केला तर तो नवीन भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीचे योगदान ठरेल असे पंतप्रधानांनी सांगितले. स्वराज्य ते सुराज्य या वाटचालीचा भाग होण्यासाठी लोकांनी आपले आयुष्य शिस्तबध्द आणि निर्धारपूर्वक घडवावे असे आवाहन त्यांनी केले.

पुढील महिन्यात शंभर वर्ष पूर्ण होणाऱ्या चंपारण सत्याग्रहाची आठवण करुन देताना पंतप्रधानांनी सांगितले की, चंपारण्य मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याद्वारे सर्वप्रथम गांधीजींचे विचार आणि गांधींजींचे आचारण व्यक्त झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संपूर्ण प्रवासात हे महत्त्वाचे वळण ठरले असे ते म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्यातील सामान्य माणसाची प्रचंड शक्ती जर स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात व्यक्त झाली तर ती सर्वांसाठी उपयुक्त आणि आनंद घेऊन येणारी ठरेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

डिजीटल व्यवहारात लोकांच्या मोठ्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, गरीबातला गरीबही रोख रकमेशिवाय व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे. विमुद्रीकरणानंतर डिजीटल व्यवहारांच्या विविध पध्दतींमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे आणि आतापर्यंत दीड कोटी लोकांनी भीम ॲप डाउनलोड करुन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचार याविरुध्दच्या लढ्यात शूर सैनिक बनावे असे आवाहन करताना पंतप्रधानांनी या वर्षात 125 कोटी देशवासियांना 2500 कोटी आर्थिक व्यवहार हाती घ्याचे असे  आवाहन केले.

नोकरदार महिलांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत करताना पंतप्रधानांनी सांगितले की, या महिलांना गरोदरपणात आणि बाळंतपणासाठी मिळणाऱ्या बारा आठवड्यांच्या मातृत्व रजेत 26 आठवड्यांपर्यंत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.भारताच्या भावी नागरिकांची जन्मापासून काळजी घेतली जावी हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मैलाचा दगड ठरणाऱ्या निर्णयाचा औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या अठरा लाख महिलांना फायदा होईल असे ते म्हणाले. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असून यावर्षी उदासिनतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

उदासीनतेचा त्रास होणाऱ्या व्यक्तींसाठी मानसिकदृष्ट्या उपयुक्त वातावरण निर्मित करण्याची गरज असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, उदासिनता बरी होण्यासारखी असते. मानसिक सुखासाठी योग हे उत्तम साधन असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिथल्या जनतेला शुभेच्छा देताना भारत हा बांगलादेशचा चांगला मित्र तसेच सामर्थ्यवान भागीदार असल्याची खात्री पंतप्रधान मोदी यांनी दिली. संपूर्ण विभागाच्या शांतता, सुरक्षा आणि विकासासाठी दोन्ही देश एकत्रित कार्य करत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली अर्पण करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या बलिदानाची व्याख्या करण्यासाठी शब्द अपुरे आहेत आणि आजही ते लोकांसाठी प्रेरक आहेत. आपल्या संवादात पंतप्रधानांनी स्वच्छता आणि अन्नाची नासाडी या मुद्यांचाही उल्लेख केला.

येत्या मंगळवारी देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या नववर्षानिमित्त पंतप्रधानांनी लोकांना शुभेच्छा दिल्या.

 
PIB Release/MH/50
बीजी -जयश्री -वैभवी

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau