This Site Content Administered by
ऊर्जा

पर्यावरणावरील जागतिक परिषद 2017 मध्ये हवामान बदलाविषयीची भारताच्या कटिबध्दतेचा   पियुष गोयल यांच्याकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली, 27-3-2017

हवामान बदलासारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा करुन नव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी पर्यावरणविषयक जागतिक परिषदेचे महत्व असून ही परिषद त्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, असे मत केंद्रीय ऊर्जा, कोळसा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली.

हवामान बदल ही समस्या मानवी चुकांमुळेच तयार झाली असून, आपणच त्यापासून मार्ग काढू शकतो हे समजून पुढची वाटचाल करणे काळाची गरज आहे, असे गोयल म्हणाले. यादृष्टीने केंद्र सरकारने ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण याचा समतोल साधत सर्वसमावेशक दृष्टीकोनातून काम सुरु केले आहे, असे गोयल म्हणाले.

एलईडी दिव्यांच्या वापराला प्रोत्साहन देऊन सरकार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 80 दशलक्ष टनने कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातून वीज बचतही होणार आहे. तसेच सौर ऊर्जा कार्यक्रमांतर्गंतही 2022 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचे सरकारचे लक्ष्य असून त्यादृष्टीने काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

खाण क्षेत्रातही पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खाणीतून निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करण्यासाठी संशोधन हाती घेतले आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्येही पाण्याचा पुर्नवापर करण्याचे आदेश सरकारने दिले असून ऊर्जा निर्मिती करतांना पाणी वाचवले जावे यावर सरकारने प्राधान्य दिले आहे, असे ते म्हणाले. वर्ष 2030 पर्यंत देशात सर्व वाहने इलेक्ट्रीसिटीवर चालावीत ज्यामुळे जीवाश्म इंधनाची बचत होईल, असे पंतप्रधानांचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 
PIB Release/DL/463
बीजी -राधिका -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau