This Site Content Administered by
मनुष्‍यबळ विकास

कल्पकता हा देशासाठी शाश्वत विकासाचा एकमेव मार्ग – प्रकाश जावडेकर
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 च्या अंतिम फेरीचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मुंबईत उद्‌घाटन

 


मुंबई, 1-4-2017

कल्पकता  हा देशासाठी शाश्वत विकासाचा एकमेव मार्ग असल्याचे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या वतीने आयोजित  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017  च्या अंतिम फेरीच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. मुंबईसोबतच देशातील इतर 26 शहरांमध्ये शासनाच्या 29 विभागांच्या सहकार्याने एकाच वेळी सकाळपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या आपण डिजिटल युगात आहोत,   आपल्या देशातील  112 कोटी जनतेकडे  आधारक्रमांक आहे, 108 कोटी लोकांकडे मोबाईल आहे यावरुन लोकांची तंत्रज्ञान आत्मसात करण्याची   क्षमता विलक्षण असल्याचे दिसून आले आहे.   हाच नवीन भारत असून यातूनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठले जाईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

सध्या आपले सरकार स्टार्ट अप या उपक्रमाला चालना देत असून सर्व आयआयटी कॅम्पसना स्टार्ट अप सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत 600 हून अधिक स्टार्ट अप कार्यरत झाल्याचे त्यांनी  यावेळी नमूद केले.

पंतप्रधानांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून  कल्पकता आणि गुंतवणूक क्षेत्रातील लोकांना पुढे येण्याचे आवाहन करत अभिमानाने मेड इन इंडियाचा शिक्का गिरविण्यास सांगितल्याचा  जावडेकर यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 जगातील पहिला सर्वात  मोठा भारतीय हॅकेथॉन कार्यक्रम  असल्याचे जावडेकर यांनी यावेळी घोषित केले.

स्मार्ट इंडिया  हॅकेथॉन 2017 हा एक स्तुत्य उपक्रम आणि मोठा प्रयत्न असून या माध्यमातून  लोकांना सहजपणे त्यांच्या छोटया-मोठया समस्यांचे उत्तर मिळण्यास मदत होणार असल्याचे जावडेकर  म्हणाले.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता  आणि नैपुण्य यांना चालना देणे,  'स्टार्ट अप इंडिया  स्टँड अप  इंडिया’  या  अभियानाकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणेप्रशासनाची गुणवत्ता   व नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे, नागरिकांना राष्ट्रनिर्माणातील योगदान देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याची संधी उपलब्ध करुन देणे हा स्मार्ट इंडिया  हॅकेथॉनचा उद्देश  आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाला विविध 29 सरकारी मंत्रालये आणि विभाग यांच्याकडून  598 समस्या प्राप्त झाल्या होत्या व या समस्यांवर निराकरणाच्या कल्पना सुमारे 2100 महाविद्यालयातील  7531 संघाकडून प्राप्त झाल्या. यापैकी 1266 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले.  ज्यात 10  हजार  विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अंतिम फेरीदरम्यान हे संघ सलग  36 तास त्यांच्या कल्पनावर आधारित उत्पादने तयार करण्यासाठी   कार्य करत असून नव्याने विकसित उत्पादनांचे तज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल व  विजेत्यांना   बक्षिसे दिले जातील. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये एक लाख, रुपये पंचाहत्तर हजार आणि रुपये पन्नास हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आश्रयदाते आहेत.

दरम्यान स्मार्ट इंडिया हॅकेथॉन  2017 मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करणार आहेत.

 
PIB Release/MH/53
सप्रे -सो.तु. -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau