This Site Content Administered by
वस्‍त्रोद्योग

यंत्रमाग क्षेत्राचा दर्जा सुधारण्यासाठी 30 टक्के अनुदान – स्मृती इराणी

 


मुंबई, 1-4-2017

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, यांच्या हस्ते, आज महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयातल्या भिंवडी येथे पॉवरटेक इंडिया या यंत्रमाग सर्वंकष विकास योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

भिंवडी हे यंत्रमाग क्षेत्रातील पुनरुज्जीवनाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले.  एप्रिल पासून लोकांना लाभ मिळावा यासाठी मार्च अखेरपर्यंत ही योजना सुरु करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते असे त्या म्हणाल्या.

पॉवर टेक्स इंडिया योजनेमुळे छोटया यंत्रमाग धारकांचा टिकाव लागण्यात मदत होईल, असे इराणी यांनी सांगितले. यंत्रमाग उद्योगाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी सरकारने अनुदानात 30 टक्क्यांची वाढ केली आहे. यार्न बँक अर्थात धाग्यांची  बँकेकडे लक्ष पुरविण्यात आले आहे आणि 11 विणकरांनी निर्मित केलेल्या यार्न बँकेसाठी 2 कोटी रुपयां पर्यंतचे सहाय्य देण्यात येईल. या योजनेअंतर्गंत  एक समाईक  सुविधा केंद्र सुरु करण्यात येईल आणि मुद्रा योजनेअंतर्गंत सरकार कमी  व्याज दराने कर्ज उपलब्ध  करुन देईल. भारतीय लघु उद्योग विकास बँक अर्थात (SIDB)च्या  मदतीने यंत्रमाग आपल्या व्यवसायाचा विस्‍तार करु शकेल. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या यंत्रमागाना 50 टक्के  आर्थिक मदत दिली जाईल, असे स्मृती इराणी म्हणाल्या.

यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या हस्ते पॉवर टेक्स इंडिया हेल्पलाईनचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेची देशभरात प्रसिध्दी व्हावी यासाठी पॉवर टेक्स व्हॅनलाही  हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

मालेगाव, इचलकरंजी, कोल्हापूर (महाराष्ट्र), सुरत (गुजरात), भागलपूर (बिहार), इरोड (तामिळनाडू), बंगळुरु (कर्नाटक), वाराणीसी (उत्तर प्रदेश) आणि इतर ठिकाणांशी व्हिडिओ  लिंकद्वारे संवाद साधण्यात आला.

देशातील यंत्रमाग क्षेत्र सुरु करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी योजना असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले. या योजनेमुळे महाराष्ट्रातील यंत्रमाग केंद्रांना  लाभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे यंत्रमाग केंद्र असल्याने केंद्र सरकारने या योजनेचा प्रारंभ करण्यासाठी भिवंडीची निवड केल्याचे  फडणवीस  म्हणाले. राज्य सरकारने काही वर्षात अर्थसंकल्पात ऊर्जेवरील अनुदानात वाढ केली आहे. या क्षेत्रा करता  सौर ऊर्जेसाठीही अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

खासदार कपिल पाटील, वस्त्रोद्योग आयुक्त  कविता गुप्ता आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 
PIB Release/MH/55
सप्रे -जयश्री -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau