This Site Content Administered by
अर्थ

दक्षिण आशियाई उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य परिषदेत वित्तमंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन
“21व्या शतकात आशियाला सक्षम बनवणे”

नवी दिल्ली, 3-4-2017

नवी दिल्लीत झालेल्या दक्षिण आशियाई उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य परिषदेत आज सर्व सदस्य देशांच्या वित्तमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत एस.ए.एस.ई.सी.चा गेल्या 16 वर्षातला प्रवास, विविध क्षेत्रात परिषदेने मिळवलेले यश आणि भविष्यातल्या कार्यांबद्दल चर्चा झाली.

सदस्य राष्ट्रांमध्ये दळणवळण, व्यापार सुविधा, ऊर्जा, पार्याभूत सुविधा अशा क्षेत्रात या परिषदेच्या माध्यमातून देवाणघेवाण होत असते. त्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर एक संघटना म्हणून तिचे महत्व अधोरेखित झाले आहे. या परिषदेचे काम निश्चित करुन त्या देशाने धोरणात्मक प्रयत्न करण्यासाठी गेल्या वर्षी एस.ए.एस.ई.सी. कार्य आराखडा 2016-2025 स्वीकारण्यात आला. त्या कार्य आराखड्यानुसार सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापारी संबंध वाढवणे आणि नैसर्गिक स्रोत, उद्योग, पायाभूत सुविधा यांच्या देवघेवीतून परिषदेतल्या एकूण सदस्य राष्ट्रातले सकल उत्पादन 70 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवणे आणि 2025 पर्यंत 20 दशलक्ष लोकांसाठी रोजगारनिर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे.

एस.ए.एस.ई.सी.ने आपल्या धोरणांनुसार पथदर्शी उपक्रम हाती घेतले असून, विविध क्षेत्रातल्या संधींचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार बांग्लादेश, भूतान, भारत आणि नेपाळ या देशांमध्ये रस्ते जोडणी प्रकल्प सुरु झाला आहे, त्यातून सीमापार व्यापाराला तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला मदत होईल. भारत आणि नेपाळ यांच्यात इलेक्ट्रॉनिक मालवाहतूक व्यवस्था तयार करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. नैसर्गिक वायू आणि इंधन यांच्यातील देवाणघेवाणीचाही प्रकल्प विचाराधीन असल्याचे सदस्य राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहेत. आशियाई विकास बँकेनं एस.ए.एस.ई.सी.ला दिलेल्या पाठबळासाठी सर्व सदस्य राष्ट्रांनी आभार व्यक्त केले.

एस.ए.एस.ई.सी.मध्ये भारत, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि मालदीव या देशांचा समावेश आहे.

 
PIB Release/DL/515
बीजी -राधिका -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau