This Site Content Administered by
माहिती आणि प्रसारण

राजधानीतील उगादी समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती
वैविध्य ही भारताची ओळख आणि सामर्थ्यही
वेंकय्या नायडू यांनी उगादी मिलन समारंभाचे आयोजन केले

नवी दिल्ली, 26-3-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे उगादी समारंभाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी वैविध्य ही भारताची ओळख आणि सामर्थ्य असल्यावर भर दिला. माहिती आणि प्रसारण, शहर विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्‌य निर्मूलन मंत्री एम.वेंकय्या नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की उत्सव हे निसर्गाच्या बदलत्या रुपाचे प्रतिबिंब आहे आणि आपली संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले आहेत. सरकारच्या एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमामुळे नवीन पिढीला विविध राज्यांचे वैविध्य आणि त्यांची संस्कृती जाणून घ्यायला मदत होईल, तसेच सर्व भारतीयांमध्ये एकतेची भावना दृढ होईल. आपती संस्कृती आणि परंपरा यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमासंदर्भात पंतप्रधानांनी हरियाणा आणि तेलंगण यांच्यातील सामंजस्य कराराचे उदाहरण दिले. या करारामुळे दोन्ही राज्यांना चित्रपट महोत्सव, भाषा, खाद्य पदार्थ या क्षेत्रात सहकार्य करण्याची तसेच खेळाडू धोरणकर्ते आणि कायदेतज्ञ यांच्यातील आदानप्रदानासाठी संधी मिळेल.

जटायू मोक्षम या सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की, जटायूचा संघर्ष हा आपणा सर्वांसाठी दहशतवादाचा धैर्याने सामना करण्यासाठी प्रेरणादायी आहे.

 
PIB Release/DL/545
बीजी -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau