This Site Content Administered by
महिला व बालविकास

नवीन टॅक्सी धोरण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महिलांच्या सुरक्षेशी संबंधित शिफारसींचा समावेश

नवी दिल्ली, 12-4-2017

टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा लक्षात घेत महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने  सुचविलेल्या शिफारशींचा समावेश नवीन टॅक्सी धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आला आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी रस्ते परिवहन मंत्रालयाला या शिफारशी सुचविल्या आहेत.

टॅक्सी प्रवासादरम्यान काही महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर  ही मार्गदर्शक तत्वे सुनिश्चित करण्यात आली आहेत.  त्यानुसार टॅक्सीमध्ये जीपीएस पॅनिक संयत्रे बसविणे  बंधनकारक आहेत. महिला आणि बालकांची सुरक्षा लक्षात घेता टॅक्सीमध्ये  सेंटर लॉकींग सिस्टिम असू नये,  टॅक्सीमध्ये वाहनचालकाच्या सचित्र ओळखपत्रासह  वाहनांचा नोंदणी क्रमांक ठळकपणे नमूद केलेला असावा. टॅक्सी चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी तसेच प्रवाशाच्या इच्छेनुसारच टॅक्सीमधून सहप्रवाशाला  प्रवास करण्याची अनुमती द्यावी, अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत.

 
PIB Release/DL/580
बीजी -माधुरी -अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau