This Site Content Administered by
मनुष्‍यबळ विकास

जीवनातील विसंगती ओळखून विनोदाने त्यावर मात करण्याचे कौशल्य आवश्यक प्रकाश जावडेकर
द.मा.मिरासदार यांच्या नव्वद वर्षपुर्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

 


पुणे, 13-4-2017

उत्कृष्ट चित्रपट कलाकृती निर्मितीसाठी चित्रपटामध्ये नाट्य आणि नाट्यामध्ये कथानक चांगल असणे आवश्यक आहे. सर्वसामान्य जीवनातील विसंगती ओळखता आली, तर विनोदातून तिच्यावर मात करण्याचे कौशल्य उपजत असावे लागते परंतु हे कौशल्य द.मा.मिरासदार यांनी अंगभूत गुणांनी विकसित केले आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. सात संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या द.मा.मिरासदार सत्कार समारंभात पुणे येथे ते बोलत होते.

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कथाकार द.मा.मिरासदार यांनी आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण केली त्या निमित्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

शिक्षणातील विसंगतीकडे लक्ष वेधत जावडेकर म्हणाले की आजकाल वातानुकूलित वर्ग असल्याने शंभर टक्के उपस्थिती असल्याचे प्राध्यापक सांगतात परंतु आमच्या वेळेला सकस, दिलखुलास व्यक्तिमत्वाचे मिरासदार यांच्या सारखे शिक्षक असल्याने नेहमीच वर्ग भरलेला असायचा.

आजकाल विनोद बुद्धी कमी होत असल्याचे नाकारत ते म्हणाले की सोशल मिडिया या मध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे. 

सत्काराला उत्तर देताना मिरासदार यांनी जीवन हे अत्यंत कठीण असून विविध दु:खांनी भरले असले, तरी विनोदासारखे दुसरे रामबाण औषध नाही. विनोदच आपल्याला कठीण प्रसंगातून तारून न्यायला मदत करतो असे सांगितले. त्यांनी आपल्या विनोदीशैलीत अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांची मने जिंकली. प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संस्कृत मानपत्र देऊन मिरासदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मिरासदार यांच्या जीवनावरील लघुपट दाखविण्यात आला.

द.मा.मिरासदार यांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मिरासदारांचे लेखन साहित्य नव्वद शाळांमध्ये प्रत्येक वर्षी देण्यात येणार आहे.

यावेळी अभिनेते रवींद्र मंकणी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी, मिरासदार कुटुंबीय आणि सात संस्थांचे आयोजक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 
PIB Release//61
दे -सो.तु. -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau