This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांनी नागपूरमध्ये भीम-आधार पे ॲपचा शुभारंभ केला
अंगठ्याचा ठसा आता डिजिटल साक्षरता म्हणून ओळखला जाणार

 


नागपूर, 14-4-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथे भीम-आधार पे ॲपचा शुभारंभ केला. ही बायोमेट्रिक आधारित देयक प्रणाली असून, यामुळे अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने पैसे भरणे प्रत्यक्षात येणार आहे.

भीम-आधार ॲपमुळे आधारचा वापर करुन डिजिटल पद्धतीने पैसे भरण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यापाऱ्याच्या बायोमेट्रिक प्रणित उपकरणावर अंगठ्याच्या ठशासारखी बायोमेट्रिक माहिती वापरुन डिजिटल पद्धतीने पैसे देता येतील.

भीम-आधार मंचाच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाला स्मार्ट फोन, इंटरनेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर न करता डिजिटल व्यवहार करता येतील. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अशा लोकांसाठी यामुळे डिजिटल पद्धतीने पैसे भरणे सुलभ होणार असून, त्याद्वारे डॉ.आंबेडकरांचे सर्वांसाठी सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

27 प्रमुख बँका 3 लाख व्यापाऱ्यांबरोबर जोडलेल्या असून, ते आता भीम-आधारचा वापर करुन पैसे स्वीकारायला सुरुवात करु शकतील.

 
PIB Release//62
दे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau