This Site Content Administered by
नीति आयोग

डिजिटल व्यवहार क्रांती : सद्यस्थिती

नवी दिल्ली, 14-4-2017

डिजिटल व्यवहारांची प्रगती

·  25 डिसेंबर 2016 रोजी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनांचा शुभारंभ.

·  देशभरातील 100 शहरांमध्ये 100 डिजिधन मेळाव्यांचे आयोजन.

·  भारतात डिजिटल व्यवहार ही लोक चळवळ बनवण्यासाठी नीति आयोगाच्या नेतृत्वाखाली 100 दिवसांचे माहिती, शिक्षण आणि दूरसंचार अभियान.

·  27 राज्ये आणि 7 केंद्रशासित  प्रदेशातल्या 100 ग्रामीण तसेच शहरातल्या 15,000 संस्थांनी रोकडरहित व्यवहारांच्या  पर्यायांचा अवलंब केला.  छोटी शहरे, खेडयांमधल्या  15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी भेट दिलेल्यांमध्ये   या मेळयामध्ये लाखो लोकांनी बँक खाती उघडली आणि आधार कार्डही काढली.

·  विविध स्तरातल्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांसह 16 लाख विजेत्यांनी 258 कोटी रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत.

·  या महासोडतीतल्या विजेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर येथे सत्कार करण्यात आला.

·  भीम ॲप आणि क्यू आर कोड्सचा शुभारंभ.

·  भीम ॲपने नवीन जागतिक विक्रम नोंदवला असून, डिसेंबर 2016 मध्ये याचा शुभारंभ झाल्यापासून केवळ चार महिन्यात 1.9 कोटी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे.

·  देशभरात UPI, USSD, AePS यासारख्या अनेक सोप्या डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करुन व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

·  नोव्हेंबर 2016 पर्यंत, 101 कोटी रुपयांचे 2.8 लाख डिजिटल व्यवहार झाले होते. त्यानंतर चार महिन्यात, मार्च अखेरपर्यंत, विविध डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करुन करण्यात आलेल्या व्यवहारांची संख्या 23 पटीने वाढून ती 63.8 लाख इतकी झाली, तर 2425 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले.

·   आधार प्रणित पेमेंटच्या व्यवहारांची संख्या नोव्हेंबर 2016 मधील 2.5 कोटीच्या तुलनेत मार्च 2017 मध्ये 5 कोटींहून अधिक झाली आहे.

·   तात्काळ भरणा सेवा (आयएमपीएस) व्यवहार देखील या कालावधीत 3.6 कोटींवरुन 6.7 कोटी इतके वाढले.

भीम-आधार हा भीम ॲपवरील व्यापाऱ्यांसाठीचा विभाग

·   भीम-आधार ॲपमुळे आधारचा वापर करुन डिजिटल पद्धतीने पैसे भरण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

·  प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यापाऱ्याच्या बायोमेट्रिक प्रणित उपकरणावर अंगठ्याच्या ठशासारखी बायोमेट्रिक माहिती वापरुन डिजिटल पद्धतीने पैसे देता येतील.

·  भीम-आधार मंचाच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाला स्मार्ट फोन, इंटरनेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर न करता डिजिटल व्यवहार करता येतील.

·  27 प्रमुख बँका 3 लाख व्यापाऱ्यांबरोबर जोडलेल्या असून, ते आता भीम-आधारचा वापर करुन पैसे स्वीकारायला सुरुवात करु शकतील.

ऑन बोर्डिंग

·   एकूण ऑन बोर्डिंग (सिंडीकेट माहितीसह): 7.15 लाख, व्यवहार : 12.62 लाख

·   आधार : 1.75 लाख

·   भीम/UPI : 4.79 लाख

·   QR Code : 1.68 लाख

भीम – कॅश बॅक आणि रेफरल बोनस योजना

·  डिजिटल पेमेंटची संस्कृती तळागाळापर्यंत पाझरावी हा यामागील उद्देश आहे.

·  रेफरल बोनस योजनेअंतर्गत सध्याच्या भीम ॲपचा वापर करणारे आणि नवीन वापरकर्ते यांच्या खात्यात कॅश बोनस थेट जमा होईल.

·  कॅशबॅक योजनेअंतर्गत, भीमचा वापर करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कॅशबॅकचा लाभ मिळेल. या दोन्ही योजना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत चालवल्या जातील आणि नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून त्यांची अंमलबजावणी केली जाईल.

·   या दोन नवीन योजना 495 कोटी रुपयांच्या असून, कालावधी सहा महिने असेल.

75 शहरे कमीत कमी रोकड वापरणारी शहरे म्हणून जाहीर

·    चालू आर्थिक वर्षात 2500 कोटी डिजिटल व्यवहारांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातली 75 शहरे किमान रोकड वापरणारी शहरं म्हणून जाहीर केली.

·   पेमेंट स्वीकारण्यासाठीच्या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत आणि शहरातली सर्व कुटुंब प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट झाली आहेत. अशा शहरांना किमान रोकड वापरणारी शहरं म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

·    प्राईस वॉटर हाऊस कूपर्सने केलेल्या मूल्यांकनावर आधारीत ही निवड करण्यात आली आहे.

·   विहित कालावधीत 80 टक्क्यापेक्षा जास्त व्यवहार डिजिटल पद्धतीद्वारे करणाऱ्या शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

M.Desai/S.Tupe/S.Kane/N.Chitale/D.Rane

 

 
PIB Release/DL/606
दे -काणे -दर्शना

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau