This Site Content Administered by
रस्ते आणि महामार्ग वाहतूक

नितीन गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेतला आढावा

नवी दिल्ली, 18-4-2017

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना जलद गतीने मंजुरी देण्यावर आणि बांधकाम वेगाने करण्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेताना ते बोलत होते. 16,271 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देण्यात आली आहे आणि 2016-17 या वर्षात 8,231 कि.मी. मार्ग बांधून झाला असला तरी अधिक कामांना मंजुरी देण्यासाठी तसेच मंजुरी मिळालेल्या महामार्गांचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी अधिक गतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोत्तम काम करणारे प्रकल्प संचालक आणि विभागीय अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात येईल असे ते म्हणाले.

मुंबई-वडोदरा, बंगळुरु-चेन्नई आणि दिल्ली-अमृतसर-कटारा महामार्गांना जून 2017 पर्यंत मंजुरी देण्यात येईल. तसेच जून 2017 पर्यंत महामार्गाजवळील 33 सुविधांबाबत निविदा काढण्यात येणार आहेत. 31 मार्च 2018 पर्यंत सर्व टोल नाक्यांवरील सर्व मार्गिकांमध्ये इलेक्ट्रॉनिक टोल वसुली उपलब्ध करुन देण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.

प्रकल्पांच्या अंमलबजावणीत भू-संपादनाच्या येणाऱ्या समस्येबाबत बोलतांना गडकरी यांनी हा मुद्दा सोडविण्यासाठी संबंधित राज्य सरकारांनी सकारात्मक सहकार्य द्यावे असे सांगितले. वन विषयक मंजुरी, स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक यासारख्या मुद्यांवर जलदगतीने निर्णय घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

 
PIB Release/DL/618
बीजी -जयश्री -प्रिती

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau