This Site Content Administered by
-

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकारसह मुंबई विद्यापीठात 3 जानेवारीला डिजिधन मेळा आयोजित करणार

 


मुंबई, 2-1-2017

मुंबईकरांसह राज्यातल्या नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारांची सवय प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारसह मुंबईत 3 जानेवारीला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात सकाळी 10.30 ते 4.30 पर्यंत एक दिवसाचा डिजिधन मेळा आयोजित करणार आहे.

या मेळयात विविध बँका, ई-वॉलेट, टेलिकॉम आणि वाहतूक नेटवर्क कंपन्या, आधार संलग्न भरणा यंत्रणा (एईपीएस) विक्रेते, व्यापारी संघटना, आपले सरकार सेवा केंद्रचालक रास्त किंमत दुकानदार, छोटे विक्रेते, एमएसआरएलएम, एनपीसीआय येणार आहे.

ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी  डिजिधन व्यापार योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. डिजिटल भरणा पध्दतींना चालना देण्यासाठी भारत सरकार ग्राहक आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देत असून या योजना त्यासाठी आखण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोग आणि केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग कठोर परिश्रम घेत आहेत.

लकी ग्राहक योजनेत बक्षिसे दैनंदिन  आणि साप्ताहिके आधारे देण्यात येणार आहेत. तर डिजिधन व्यापार योजनेत ती साप्ताहिक देण्यात येणार आहेत. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

रुपे कार्डस, यूएसएसडी, यूपीआय आणि एईपीएसच्या माध्यमातून होणारे व्यवहारच केवळ या योजनेसाठी पात्र असतील. उपक्रमासाठीचे ड्रॉ डिजिधन  मेळयाबरोबर होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातल्या विविध 100 शहरांमधून काढले जातील. डिजिटल व्यवहारांना हा मंच चालना देईल, अशी अपेक्षा आहे.

25 डिसेंबर 2016 ला (ख्रिस्मसचे औचित्य साधून) पहिला ड्रॉ काढून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. 14 एप्रिल 2017 ला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून) मेगा ड्रॉ घोषित करण्यात येणार आहे.

या एक दिवसाच्या मेळाव्यात नागरिकांची बँकेत नवीन खाती उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करणे, आधार नोंदणी तसेच आधार नोंदणीमध्ये माहिती अद्ययावत करणे आदी कामेही करण्यात येणार आहेत. तसेच ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करताना कोणी सुरक्षा बाळगावी, तसेच हे व्यवहार सुरक्षित मार्गाने कसे करावेत, याविषयी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चे संचालकही डिजिटलच्या माध्यमातून सुरक्षित आणि खात्रीलायक मार्गांनी व्यवहार शिकणार आहेत. यामध्ये रास्त धान्य दुकानदार, रिक्षा आणि टॅक्सीचालक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यांना या मेळाव्यामार्फत ‘आधार’ नोंदणी करावयाची आहे, त्यांनी पुढील कागदपत्रे सोबत आणावीत.

·         नाव आणि छायाचित्र असलेला ओळखीचा पुरावा

·         वास्तव्याचा दाखल

·         जन्मतारखेचा दाखला (पॅनकार्ड, पारपत्र किंवा जन्मदाखला)

·         डिजिटल मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यापाऱ्यांनी खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

·         आधार कार्ड

·         बँकेच्या खात्याचा तपशील आणि बँक शाखेचा आयएफएससी क्रमांक

 
PIB Release/MH/1
बीजी -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau