This Site Content Administered by
-

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी डिजिधन मेळावा मुंबईत संपन्न

 


मुंबई, 3-1-2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर भविष्यात चांगला परिणाम होणार असून देशाची अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज मुंबईत केलं.

मुंबईकरांसह राज्यातल्या नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं आयोजित केलेल्या डिजिधन मेळाव्यात ते बोलत होते.  विमुद्रीकरणामुळे दहशतवादी कारवाया, नक्षलवादी कृत्ये आणि इतर समाज विघातक घटकांना आळा बसल्याचंही अहिर यांनी सांगितलं. नागरिकांनी तसंच व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त रोकडरहित व्यवहार करावे, डिजिटल साधनांचा वापर करावा, असं आवाहन अहिर यांनी यावेळी केलं.

या मेळाव्यात आधार कार्ड बनवणे, त्यामध्ये दुरुस्त्या करणे, बँक खाती उघडणे, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे, अशी विविध कामे करण्यात आली. मेळाव्यात अनेक बँका, ई-वॉलेट कंपन्या मिळून 65 स्टॉल्स लावण्यात आले होते.

  डिजिधन मेळाव्यात टॅक्सी, ऑटो चालक तसेच रास्त धान्य दुकानदार यांनी रोकडरहित व्यवहार कसे करावेत, याचे प्रात्यक्षिक दिले. तसेच पॉइंट ऑफ सेल’(पीओएस-पॉस) यंत्र कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण दिले.

या मेळयात विविध बँका, ई-वॉलेट, टेलिकॉम आणि वाहतूक नेटवर्क कंपन्या, आधार संलग्न भरणा यंत्रणा (एईपीएस) विक्रेते, व्यापारी संघटना, आपले सरकार सेवा केंद्रचालक रास्त किंमत दुकानदार, छोटे विक्रेते आणि अन्य सहभागी झाले होते.

ग्राहकांसाठी भाग्यवान ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी  डिजिधन व्यापार योजनेंतर्गत सोडत काढण्यात आली. डिजिटल भरणा पध्दतींना चालना देण्यासाठी भारत सरकार ग्राहक आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देत असून या योजना त्यासाठी आखण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोग आणि केंद्र सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग कठोर परिश्रम घेत आहेत. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रुपे कार्डस, यूएसएसडी, यूपीआय आणि एईपीएसच्या माध्यमातून होणारे व्यवहारच केवळ या योजनेसाठी पात्र असतील. उपक्रमासाठीचे ड्रॉ डिजिधन मेळयाबरोबर होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातल्या विविध 100 शहरांमधून काढले जात आहेत.

25 डिसेंबर 2016 ला (ख्रिसमसचे औचित्य साधून) पहिला ड्रॉ काढून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. 14 एप्रिल 2017 ला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून) मेगा ड्रॉ घोषित करण्यात येणार आहे.

ग्राहकांनी डिजिटल व्यवहार करताना कोणी सुरक्षा बाळगावी, तसेच हे व्यवहार सुरक्षित मार्गाने कसे करावेत, याविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली. यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या संचालकांना डिजिटलच्या माध्यमातून सुरक्षित आणि खात्रीलायक मार्गांनी व्यवहार शिकवले.

यावेळी घोषवाक्य स्पर्धा, रेडिओ जिंगल स्पर्धा दोन वयोगटांमध्ये घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाला निती आयोगाचे संयुक्त सचिव विक्रमसिंह गौर, खासदार अरविंद सावंत, क्रीडापटू वीरधवल खाडे, सुवर्णा बारटक्के आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 
PIB Release/MH/2
सप्रे -सुवर्णा -कोर

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau